0
कोथळे ( प्रतिनिधी )- कोथळे गावातील आझाद प्रतिष्ठान चांदणी चौक, कोथळे यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोथळे व परिसरातील जवळपास 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आझाद प्रतिष्ठान हे मागील 37 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. या वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव अतिशय साध्या पध्दतीने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काही रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याची बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीच्या संदर्भाने व सोबतच गणेशोत्सव साध्या पध्द्तीने साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी जपली जावी व या कोरोनाच्या लढाईत आपलाही काही वाटा असावा या हेतूने आझाद प्रतिष्ठान चे संस्थापक धनंजय भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन जेजुरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला जेजुरीचे उद्योजक डॉ. रामदास कुटे, उद्योजक रवी जोशी, जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त नितीन राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोविंद लाखे,नीरा बाजार समितीचे संचालक धनंजय भोईटे, कोथळे गावच्या उपसरपंच वंदना जगताप, आशा सेविका मनीषा शिर्के आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हडपसर येथील अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. सर्व सहभागी सदस्यांना आझाद प्रतिष्ठान च्या वतीने प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन संदिप जगताप, अजित भोईटे, सोमनाथ राऊत, आकाश शिळीमकर, अक्षय जगताप,तुषार काकडे, शिवाजी भोईटे,ओंकार भोईटे, समीर काकडे, विवेक जगताप, समीर जगताप, धनराज जगताप, रोहित भोईटे, कृष्णा राऊत,योगेश थोरात, प्रवीण भोईटे,महेश भोईटे,सागर जगताप आदींनी केले.

Post a Comment

 
Top