0

 

सासवड ( प्रतिनिधी ) - जिजाऊ ब्रिगेडच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी शिवमती उरसळ दुर्गा सदाशिव  यांची निवड करण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील कार्याची विशेष आवड , संघटनेबद्दल ची आत्मीयता, समाज परिवर्तन बद्दलची तळमळ, संघटनात्मक कौशल्य, निर्णय घेण्याची क्षमता, संघटना बाधनी बद्दलची तन, मनाने,धनाने असणारी तळमळ, महिला सक्षमीकरण अथवा महिला सबलीकरण आधी कार्यामध्ये अंगी असलेली धडपड पाहता मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ.जयश्री गटकुल यांनी दिले.शिवमती दुर्गा या वाघिरे महाविद्यालय सासवड येथे शिकत असून ,ती राष्ट्रीय सेवा योजना मध्ये कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिले आहेत.

Post a Comment

 
Top