0

 वाळूज ( प्रतिनिधी ) - औद्योगिक परिसरातील एका कंपनीच्या आवारातून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन महिलांनी चोरून तो भंगार व्यापाऱ्यास विकला.या प्रकरणी एका महिलेस भंगार व्यापाऱ्यास अटक करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र यातील एक महिलाच फरार आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील के 75 इम्प्रेशन पॅकेजिंग या कंपनीच्या आवारातून 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल रांजणगाव शेणपुंजी येथील कडूबाई संदीप बोकन (वय 40) रा. सावता मंदिराजवळ या महिलेने तीची साथीदार महिला मंगल नामदेव अहिरे (वय 35) हिच्या मदतीने शनिवारी (ता.5) रोजी रात्री 8 ते मंगळवारी (ता.8) दरम्यान ते दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान चोरून नेला. चोरी केलेला मुद्देमाल या दोन्ही महिलांनी समीर शेख उर्फ मुज्जू रहेमान शेख (वय 27) रा. विटावा. या भंगार व्यापाऱ्यास विकला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतात पोलिसांनी रविवारी (ता.13) रोजी चोरी करणाऱ्या एका महिलेला व चोरीचा माल घेणाऱ्या या व्यापाऱ्यास अटक केली. मात्र या चोरीतील मंगल नामदेव अहिरे ही महिला फरार आहे.

   सदर कारवाई एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, जमादार वसंत शेळके, खय्युखखॉ पठाण, प्रकाश 

गायकवाड, सुधीर सोनवणे, रेवननाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, धिरज काबलीये, मनमोहनमुरली कोलीमी, बंडू गोरे, दीपक मतलबे, लता गायकवाड यांनी पार पडली.

( प्रतिनिधी - अनिकेत घोडके वाळुज औरंगाबाद ) 


Post a Comment

 
Top