0

 जवळार्जुन ( प्रतिनिधी ) -  पुरंदर तालुक्यातील  जवळार्जुन गावचे पोलिस पाटील श्रीकांत मनोहर राणे यांची अखिल भारतीय ओ.बी.सी सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय ओ. बी. सी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब देडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. श्रीकांत राणे यांनी यापूर्वी लोणारी युवा विकास संस्था पुरंदर या सामाजिक संस्थेच्या सचिवपदी यशस्वी काम केले आहे अतिशय परखड आणि वास्तववादी भाषण शैली यामुळे ते परिसरात धडाडीचे युवक नेतृत्व म्हणून उदयास येत आहे माजी आमदार अशोक टेकवडे , माजी सरपंच आप्पासाहेब राणे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत राणे, लोणारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अखिल भारतीय ओ.बी.सी सेवा संघाच्या पुणे ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्रीकांत राणे म्हणाले की समाजाच्या न्याय हक्कासाठी  कार्यरत राहून समाजाची उन्नती आणि प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रसंगी महाराष्ट्र कार्याध्यक्ष यशवंत पडळकर उपप्रदेश अध्यक्ष आप्पा भंडलकर संघटक संतोष तायडे साहेब उपस्थित होते.


Post a Comment

 
Top