0

 पुणे ( प्रतिनिधी ) -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरंदर -हवेलीचे आमदार संजय जी जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा कॉंग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय , माहूर ता. पुरंदर जि. पुणे येथील उपशिक्षक रामप्रभू दशरथ पेटकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

     या निवडीच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे , महाराष्ट्र कॉंग्रेस शिक्षक सेलच्या उपाध्यक्षा सुजाता चौ खंडे माळी  महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे महासचिव शिवाजी खांडेकर सचिव पंडीत सातपुते पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कार्याध्यक्ष संजय धुमाळ , ज्ञानेश्वर यादव, प्रदीप ठाकर, सय्यद तकदीर रशीद इ . मान्यवर उपस्थित होते .

      या निवडीच्या वेळी राम प्रभू पेटकर म्हणाले , जिल्ह्यातील सर्व समविचारी शिक्षक बांधवांना बरोबर घेऊन काम करू. व शिक्षकांचे प्रश्न यामाध्यमातून निश्चीत सोडवण्याचा प्रयत्न करू.

            पुरंदर -हवेली चे आमदार व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय जी जगताप अध्यक्षा आनंदी काकी जगताप , संस्थापक सचिव प्रा. एम.एस. जाधव सहसचिव दत्तात्रय गवळी , व्यवस्थापक कानिफनाथ आमराळे त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवडी बद्दल अभिनंदन केले


Post a Comment

 
Top