0

जेजुरी दि.६ (प्रतिनिधी)- धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे यासाठी घटस्थापनेच्या एक दिवस अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज बांधवांच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे ओबीसी चे तथा धनगर समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले.
धनगर आरक्षण लढा समन्वय समिती (महाराष्ट्र राज्य)यांची नुकतीच लोणावळा येथे बैठक घेण्यात आली यावेळी माजी ग्राम विकास मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार पोपटराव गावडे, रमेश शेंडगे, रामराम वडकुते, गणेश दादा हाके, आदि मान्यवर व दोनशे पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, माजी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर व विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर काही कारणास्तव बैठकीस उपस्थित राहु शकले नाहीत परंतु धनगर आरक्षण लाढ्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी भ्रमनध्वनी वरुन सांगितले, यावेळी धनगर आरक्षण लाढ्यासंदर्भात प्रत्येकाने आपली मते मांडली, येत्या सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले, या बैठकीस महाराष्ट्र राज्यातील पुणे, नाशिक, कर्जत,कराड, सोलापूर, मुंबई, ठाणे, अहमदनगर, परभणी, पंढरपूर, हिंगोली आदी भागातुन समाज बांधव उपस्थित झाले होते
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a comment

 
Top