0

 पुरंदर ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुका हा बौध्दीक तालुका म्हणून ओळखला जातो.शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी अग्रेसर असणारा तालुका अशी पुरंदची राज्यभर ओळख आहे. बेलसर(ता.पुरंदर) येथील बालसिध्दनाथ विद्यालय येथे चोरीचा प्रकार घडला आहे. सदर चोरी बाबत जेजुरी पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालसिद्धनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र निगडे यांनी तक्रार दाखल केली. अज्ञातांनी  26 तारखेच्या रात्री शाळेचा 15000 किमतीचा पावर किंग एल पी जी कंपनीचा एक विद्युत जनरेटर पळवला असल्याची तक्रार देण्यात आली आहे.बेलसरगाव हे सीसीटीव्ही च्या कक्षेत असल्यामुळे गुन्हेगारांना पकडन्यात मदत होणार आहे.पुढील तपास जेजुरी पोलिस स्टेशन करीत आहे.


Post a Comment

 
Top