0

 वाळूज ( प्रतिनिधी ) - वाळूज औद्योगिक परिसरातील संजीव ऑटो या कंपनी मधील रमेश महाजन तिवारी(वय-३५) यांनी दि.२२ रोजी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की, ते संजीव ऑटो प्लॉट-B ३०  याठिकाणी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून कामावर असून त्यांच्या कंपनीमध्ये ५,८९,१२५ रु. किमतीचे टेम्पर हब, स्पीड गेअर हब ची पाहणी केली असता सदर साहित्य मिळून आले नाही. यावर ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम मावळे हे करीत आहेत. तपासादरम्यान पोलीसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून गुन्ह्यातील चोरीला गेला असलेला माल व आरोपीचा शोध घेतला असता माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीला गेलेला मला हा यापूर्वी कंपनी ठेकेदारामार्फत नेमलेल्या कंत्राटी कर्मचारी संतोष गोरखनाथ खोसे वय-२७ रा.घर १०८२८ शांतीनगर रांजणगाव शेणपुंजी याने चोरी केला असून आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यात पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, ५,८९,१२५ रु. किमतीचे टेम्पर हब, स्पीड गेअर हब जप्त करण्यात आले आहेत. अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो कंपनीत मागील दोन वर्षापासून काम करत होता. त्याला दसरा सणाच्या दोन दिवस आधी काहीही कारण नसताना कंपनीतून अचानकपणे काढून टाकले त्यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगितले सदर आरोपी हा पी.सी.आर मध्ये असून त्याच्या ताब्यातून आणखी मुद्देमाल मिळण्याची ची शक्यता आहे. ही कामगीरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, खय्युमखाँ पठाण, प्रकाश गायकवाड, रेवन्नाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, सुधीर सोनवणे, हरिकराम वाघ, बंडू गोरे, दिपक  मतलबे यांनी केली आहे.  ( प्रतिनिधी अनिकेत घोडके, महाराष्ट्र वार्ता  वाळूज औरंगाबाद )Post a Comment

 
Top