जेजुरी ( प्रतिनिधी ) - तीर्थक्षेत्र जेजुरीमधील श्री मार्तंड देवसंस्थांच्या प्रमुख विश्वस्तपदी ॲड. प्रसाद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सात विश्वस्तांच्या ठरावानुसार प्रत्येक विश्वस्तांना नऊ महिन्यांचा कालावधीसाठी प्रमुख विश्वस्त पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. यानुसार मुख्य विश्वस्त जगताप यांनी राजीनामा दिल्याने ॲड.शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी विश्वस्त संदीप जगताप, राजकुमार लोढा,शिवराज झगडे, तुषार सहाने,ॲड. अशोक संपकाळ, पंकज निकुडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
Post a comment