0

 सासवड ( प्रतिनिधी )  -ऋणानुबंध ग्रुप ने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीचा सण वृध्दाश्रमात आणि पोलीस बांधवांसोबत साजरा केला. या ग्रूप ने आजवर अनेक सामाजिक कामात आपले योगदान दिले आहे सासवड येथील " जिव्हाळा वृध्दाश्रमात " दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण वृक्षारोपण आणि दिवाळीचा फराळ वाटप करून  दिवाळी साजरी करण्यात आली .त्याचबरोबर भाऊबीजेच्या निमित्ताने सासवड पोलीस ठाणे मधील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना ओवाळून भाऊबीज साजरी करण्यात आली , या वेळी  सासवड पोलिस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश  माने आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top