0

 पुरंदर ( प्रतिनिधी ) - १ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका सध्या सुरू आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार 'डॉ. श्रीमंत कोकाटे' यांच्या प्रचारार्थ पुणे जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने बैठकांचे सत्र सुरु आहे. हि कारखानदारीची निवडणूक नसून पदवीधरांची आहे, पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषेदेत मांडण्यासाठी प्रविणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डॉ.श्रीमंत कोकाटे यांना पुणे जिल्ह्यातून प्रचंड मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी केले.
       पुणे पदवीधर मतदार संघातील प्रस्थापित पक्षांच्या कार्यशून्य उमेदवारांना पराभूत करण्याच्या आणि पदविधरांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याच्या उद्देशाने या निवडणुकीतील सर्वात जास्त उच्चशिक्षित उमेदवार 'डॉ. श्रीमंत कोकाटे' यांच्या जिल्हाभरात कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी  पुरंदर तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान घडवून आणणे, डॉ. कोकाटे यांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करणे, सर्व पदविधरांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेण्यावर भर देणे, प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जाबबदारी पार पाडणे, बुथसाठी प्रतिनिधी नेमणे, अशा विविधांगी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते संदीप जगताप, तालुकाध्यक्ष सागर जगताप , जिल्हा उपाध्यक्ष संतोष हगवणे, संतोष बयास  ,अजय जगताप,गौरव जगताप,आनंद जंगम, विक्रमराजे शिंदे आदी उपस्थित होते.


 

Post a Comment

 
Top