0

 सासवड (  प्रतिनिधी ) - ग्रामपंचायतीच्या स्थापनेस ६५ वर्ष होऊन अनेक वेळा ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही बिनविरोध होऊ न शकलेली पिसे ग्रामपंचायत प्रथमच ग्रामस्थ व तरुणांनी घेतलेल्या पुढाकाराने बिनविरोध झाली .ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक होत आहे .
  पिसे ग्रामपंचायत सण १९५६ मध्ये स्थाप झाली .श्रीनाथ म्हस्कोबा हे जागृत देवस्थान ,लक्ष्मीमाता ,तुकाई देवी,व पीरबाबा मंदिर असल्याने प्रत्येक वेळी निवडणुकीत चुरशीची वातावरण पाहायला मिळत होते .ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक वेळा ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला ,मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही .३० ते ३५ वर्ष कधी  ग्रामपंचायत बिनविरोध  न झालेली पिसे गावाचे  शंकनाथ महाराज व गावचे पत्रकार ,तरुण युवक ,महिलांनी एकत्र येत पुढाकार घेऊन ग्रामपंचायत पिसे बिनविरोध केली .ग्रामस्थांचे  श्रीनाथ ,म्हस्कोबा व पीरबाबा देवस्थांवरती श्रद्धा आहे .त्यांच्या साक्षीने गावातील मुळीक ,सांगळे,कुटे,सय्यद,ठोंबरे.शिंदकर,बोरकर ,इंगळे ,जगताप ,भरगुडे ,या भावकीतील मतदान असणाऱ्या लोकांनी आपापले उमेदवार निश्चित करण्याचे ठरल्यानंतर सर्वानी एक मताने आपले उमेदवार निश्चित केले .त्यामुळे निश्चित केलेले ७ अर्ज ठेऊन बिनविरोध  ग्रामपंचायत पिसे करण्यात यश आले .दरम्यान.ग्रामपंचायतीच्या उमेद्वारीमध्ये यापूर्वी माजी सरपंच गणेश मुळीक ,माजी उपसरपंच सोमनाथ मुळीक ,भाऊ ठोंबरे ,रामदास बाप्पू मुळीक ,बशीर सय्यद ,नंदकुमार  कुटे,दीपक मुळीक,शांताराम मुळीक ,शिवराज मुळीक ,यांनी सांगितले कि ,ग्रामस्थांनी अत्यंत विश्वासाने आम्हा सर्वाना संधी दिली असून विकासासाठी  सर्वाना बरोबर घेऊन सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
वाडॅ नं 1 मध्ये सीमा संतोष मुळीक, दोरकाबाई पांडुरंग मुळीक, रोहन नारायण मुळीक, वाडॅ नं 2 मध्ये गणेश बालासो सागले, शोभा नंदकुमार कुटे ,  वाडॅ नं 3 मध्ये पंडित गुलाब राव मुळीक,  दिलशाद सलीम सय्यद यांना संधी  देण्यात आली आहे. पिसे गाव येथील निवडणूक बिनविरोध झाली आहे . यासाठी संतोष सुरेश मुळीक व योगेश मुगुट मुळीक यांनी फामॅ माघारी घेण्यासाठी  शंखनाथ महाराज व पत्रकार पिसे गाव येथील  यांचा शब्द अंतिम मानुन खुप सहकार्य केले  त्याना पुढील कामासाठी  मदत करणार असल्याचे आश्वासन दिले . ( प्रतिनिधी - बापू मुळीक )



Post a Comment

 
Top