एखतपुर मुंजवडी ( प्रतिनिधी ) -
पुरंदर तालुक्यातील युवक आणि युवती यांनी एकत्र येत ऋणानुबंध ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋणानुबंध ग्रुप चे काम कौतुकास्पद आहे.
ऋणानुबंध ग्रुपचे सदस्य असलेले तुषार झुरंगे यांच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळून शाळेतील 200 विद्यार्थ्यांचे रक्तगट रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी केली गेली.यामध्ये शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एखतपूर- मुंजवडी,या शाळांचा समावेश होता,लवकरच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तपासणी करण्याचा त्यांचा मानस आहे,त्याचबरोबर जिव्हाळा वृध्दाश्रम सासवड येथे वुक्षरोपण,जेजुरी येथे अन्नदान अशे अनेक उपक्रम घेण्यात आले
ऋणानुबंध ग्रुप च्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचे आणि कामाचे शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळदचे प्राचार्य श्री भगवान बेकरे सर,शिवशंभो माध्यमिक विद्यालय एखपुर - मुंजवडीचे प्राचार्य भगवान बेंद्रे सर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एखतपुर- मुंजवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रोहिणी कामठे मॅडम व सर्व शिक्षकांनी ऋणानुबंध ग्रुप चे कौतुक केले.
Post a comment