1
हिवरे(ता.शिरूर):-आर्थिक वर्ष सुरू झाल्याने सध्या शिरूर तालुक्यामध्ये सरसकट थकबाकी असणाऱ्या विजपंप आणि घरगुती विजेचा पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.हा प्रकार काहीसा शेतकरी वर्गाला न पटणारा आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचं आणि संतापाच वातावरण आहे.या प्रकारामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
महावितरण च्या वतीने अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.
ऐन चालू हंगामात अवकाळी पाऊस,कोरोना यामुळे आधीच हैराण झालेला शेतकरी वर्ग कर्जवसुलीसाठी बैकांनी लावलेला तगादा,पिकांना मिळत नसलेला योग्य बाजारभाव अशा परिस्थितीला सामोरा जात आहे. महावीतरण ने हातातोंडाशी आलेली पिके विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे जळून चाललेली आहे.
महावितरण ने सूडबुद्धीने चालवलेली षडयंत्र लवकरात लवकर थांबवावी जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका अन्यथा समस्थ शेतकरी वर्गाला घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल.
शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करावं व तसेच दिवसभरात कमीतकमी 3 ते 4 तास विद्युत पुरवठा केला जावा जेणेकरून शेतकऱ्यांची तोंडाशी आलेली पिके जळणार नाहीत व जनावरांना पाण्याची सोय करता येईल अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष कु.संदेश सतीश साळुंके यांच्यावतीने करण्यात आली.
आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकरी वर्गाला आधीच अव्वाच्यासव्वा वीजबिल आलेले असतानाच विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे आंदोलनाचा इशारा हिवरे गावातील सामुदायिक विवाह सोहळ्याचे जनक श्री.विकासनाना गायकवाड,विद्यमान सरपंच सौ.शारदाताई गायकवाड,हिवरे गावचे उपसरपंच श्री. दिपकदादा खैरे आदी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कार्यालयास करण्यात आला.
महावितरणाकडून चालू असलेली मोहीम शेतकऱ्यांचा विचार करून काहीशी शिथिल करावी व शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये अशी विनंती शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदेश साळुंके यांच्यावतीने करण्यात आली.

Post a Comment

  1. मनःपूर्वक धन्यवाद☺️

    ReplyDelete

 
Top