0
पुरंदर ( प्रतिनिधी ) - "वाढीव कला गुण देऊ नये."... या शासन आदेशाची पुरंदर तालुक्यात महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ,पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ,पुणे जिल्हा व पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ,पुणे जिल्हा व पुरंदर तालुका शिक्षक संघ,पुरंदर तालुका क्रीडा संघ,पुरंदर तालुका शिक्षकेतर संघ  यांचे पदाधिकारी व पालकांच्या उपस्थितीत होळी करण्यात आली.                
       शासनाच्या शिक्षण विभागाने 26 मार्च रोजीआदेश काढून चित्रकला ग्रेड परीक्षा कोरानामुळे रद्द करण्यात आल्या त्याच बरोबर या वर्षी इंटरमिजिएट पास असलेल्या विद्यार्थांना सुद्धा दहावी परिक्षेत वाढीव गुण  मिळणार नाहीत असा तुघलकी निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. हा आदेश तात्काळ मागे घ्यावा यासाठी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे,पुरंदर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बिभीषण देडे,सचिव योगेश घोरपडे यांनी सर्व संघटनांच्या  पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तुघलकी शासन आदेशाची होळी केली.
सदर शासनादेश मागे घेऊन राज्यभरातील सर्व कलासक्त विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नंदकुमार सागर यांनी केली.
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने सदर शासन निर्णयाची होळी करू असा इशारा देण्यात आला होता . त्यानुसार आज पुरंदर तालुक्यात शासन आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.
 जर शासनाने हा आदेश मागे घेतला नाही तर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर संघाच्यावतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सुधाकर जगदाळे,सचिव रामदास शिंदे,पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे,अध्यक्ष बाबुराव गायकवाड,पुणे जिल्हा काॅंग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर,पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष इस्माईल सय्यद,कृती शिक्षक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे,पुरंदर तालुका क्रीडा संघाचे अध्यक्ष निलेश जगताप,हवेली तालुका कृती शिक्षक समितीचे सहसचिव दिलीप थोपटे,पुरंदर तालुका कलाशिक्षक संघाचे माजी अध्यक्ष  रविंद्र कामथे,सल्लागार अशोक कामथे,सहसचिव सुनील हेंद्रे,शिक्षक संघ सदस्य दीपक भोसले,शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष प्रदीप दुर्गाडे,पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव,सचिव सिद्राम कांबळे इतर सर्व पदाधिकारी व पालक वर्ग हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top