0
जेजुरी दि. १२ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ग्रामीण भागातील याचा होणारा फैलाव कमी करण्यासाठी जेजुरी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जेजुरी शहरात घरोघरी जाऊन शिक्षकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे,कोव्हिड बाधीत निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ट्रेस, ट्रॅक व ट्रिट या त्रिसुत्रीचा वापर करुन कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जेजुरी शहरात हि मोहिम राबविण्यात येत आहे, जेजुरी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जेजुरीतील प्रत्येक प्रभागात शिक्षकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे लवथळेश्वर येथे जिजामाता हायस्कूल चे शिक्षक प्रल्हाद गिरमे व पांडुरंग आटोळे हे घराघरात जाऊन सर्वेक्षण करत आहेत परीसरातील नागरिक व महिला स्वताहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top