सुशांत दशरथ खैरमौडे यांना भोई समाज रत्न *पुरस्कार* तिरूपती येथील अधिवेशनात गौरव
अंबाजोगाई प्रतिनिधी :-येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत दशरथ खैरमोडे यांना भोई समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.18 व 19 जानेवारी रोजी तिरूपती बालाजी(आंध्रप्रदेश)येथे झालेल्या राष्ट्रीय प्रथम अधिवेशनात अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रीय महासचिव श्री गजानन दादा साटोटे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. श्रीएकनाथ काटकर, राष्ट्रीय महाराष्ट्र समन्वयक भाई नानासाहेब लकारे, महाराष्ट्र सचिव श्री योगेश श्रीनाथअध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश श्री तुकाराम वानखेडे, कार्यअध्यक्ष श्रीसचिन जमदाडे, माऊली लांडगे सर, आदींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. दरम्यान,अखिल भारतीय भोई समाज संस्थेच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी सुशांत दशरथ खैरमोडे यांची निवडही करण्यात आली.सुशांत खैरमोडे यांची अंबाजोगाई तालुकाध्यक्ष पदी झाल्याबद्दल बालाजी खैरमोडे,बालाजी भूजंगे, रमेश गहिरे,लक्ष्मण हुशारे, राजाभाऊ हुशारे,खंडू जमदाडे, प्रसाद खैरमोडे,संजय बारस्कर, दत्ता बारस्कर, गणेश भुजंगे,विष्णूदास खैरमोडे, लक्ष्मण घटमल,अंकुश बलाया आदींनी अभिनंदन केले व उपस्थित होते
सुशांत खैरमोडे यांचे समाजातील सर्वांशी स्नेहाचे संबंध असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे