अंबाजोगाई

अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी गावात 50 जणांना जेवनातून विषबाधा…

अंबाजोगाई प्रतिनिधी (अशोक दळवे):-

तालुक्यातील पिंपरी येथील गाव भोजनाच्या कार्यक्रमातुन जवळपास ५० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना अंबाजोगाई तसेच लातूर येथे हलवण्यात आले आहे. तर काहींवर घाटनांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

 

पिंपरी येथे गाव भोजनाचा कार्यक्रम सुरू असून, पंधरा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आठवड्यातुन दोन वेळा गावकऱ्यांना भोजन दिले जात आहे. ८०० जणांचे जेवण तयार करण्यात आले होते. यातील ५० जणांना मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ५० रुग्णांपैकी ३५ जण अंबाजोगाई तर लातूर येथे १५ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी घटनास्थळी तसेच अंबाजोगाई येथील स्वाराती तसेच घाटनांदूर येथील रुग्णालयास भेट दिली. पिंपरी येथील जेवनातील अन्नाचे नमुने लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगि तले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893908
error: Content is protected !!