अहिल्यादेवी नगर

साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी लाखोंची रोकड पळवली…

आहिल्यानगर प्रतिनिधी :– शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश विनायक कुलकर्णी, लेखाधिकारी, यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत साई संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने दि.४, ८ आणि ११ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. १६ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशिनमध्ये ४६ हजार ५०० रुपये आणि २५ एप्रिल रोजी ५०० रुपयांचा आणखी एक बंडल (४५ते ५० हजार रुपये) आढळून आला.

 

कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले. त्याने नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, अविनाश कुलकर्णी यांनी गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्थानने गोंदकर याला अगोदरच प्राथमिक माहितीवर निलंबित केले होते. गुरुवारी या संदर्भातील सविस्तर अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीचीही कारवाई सुरू करण्यात आली आहे शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तापस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893908
error: Content is protected !!