वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषद यंदा पुरस्कार देणार बीड जिल्ह्यातल्या उत्कृष्ट मान्यवरांचा केला जाणार सन्मान वडवणी मध्ये परिषदेनं घेतला ठराव…
वडवणी प्रतिनिधी :–
वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या मुख्य कार्यालयात एक खास बैठक घेऊन तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने यंदा बीड जिल्ह्यातल्या उत्कृष्ट मान्यवरांचा सन्मान करत पुरस्कार देणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे व जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदे च्या मुख्य कार्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन बैठकीत सर्वानुमते अनेक निर्णय घेण्यात आले. जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर पोटभरे, तालुकाध्यक्ष सतिश सोनवणे, सचिव महेश सदरे यांनी आपल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनी संमती दर्शवली असून बीड जिल्ह्यांत एकुण आकरा तालुक्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करुन राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. आपण केलेल्या आपल्या कार्याचा लेखाजोखा तपासणी करून पत्रकारीता,सामाजिक,
शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याचा आधार घेऊन आपले प्रस्ताव सादर करावेत. यासाठी प्रेस नोट प्रसिद्ध करणार आहोत.
या पुरस्कारासाठी आपण उत्सुक असल्यास आपले प्रस्ताव कधी केव्हा,कुठे आणि कसे पाठवायचे याची संपूर्ण माहिती लवकरच देणार आहोत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन हा प्रत्येक वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. याच अनुषंगाने आम्ही वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नवे ध्येय,नवी वाटचाल बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सुरू करत आहोत. असा सर्वानुमते ठराव आम्ही संमत करून पत्रकारांच्या हिताच्या विविध विषयावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे,जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार सुधाकर पोटभरे,तालुकाध्यक्ष पत्रकार सतिष सोनवणे,सचिव पत्रकार महेश सदरे,उपाध्यक्ष पत्रकार धम्मपाल डावरे, डिजिटल मिडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष संपादक ओमप्रकाश साबळे, कोषाध्यक्ष पत्रकार वाजेद पठाण,शहराध्यक्ष पत्रकार गितांजली लव्हाळे मॅडम,पत्रकार हरिभाऊ पवार, पत्रकार अतुल जाधव,पत्रकार संभाजी लांडे, पत्रकार राम चौरे, पत्रकार विजय राऊत सह आदींची उपस्थिती होती.