नाशिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात…

नाशिक प्रतिनिधी:-

नुकतेच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची  आणखी एक घटना समोर आली आहे. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यु झाला असून, त्यांच्या पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

 

अधिक माहिती अशी की, बुधवारी सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून  नाशिककडे आलिशान मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने तीन वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला,अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यु झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893906
error: Content is protected !!