
*श्री विजय रापतवार अध्यक्ष शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई*
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
जिल्हा परिषद शाळा मध्ये कार्यरत असलेले शिक्षक दररोज 40 प्रकारची विविध ॲप्स वापरत आहेत.
दररोज शिक्षकांना विविध ऑनलाईन ॲप्स लिंक अहवाल सर्वेक्षण,प्रशिक्षण मध्ये व्यस्त रहावे लागत आहे, हे सर्व वेगवेगळे मिळून एकूण 40 ॲप्स आहेत त्यांचे सर्व्हर कधी चालतं कधी चालतं नाही त्यामुळे शिक्षक जवळपास दिवसभर यामध्येच व्यस्त असतात त्यामुळे शासनाने हे सर्व 40 ॲप्स एकत्र करून शाळांच्या ऑनलाइन कामासाठी एकत्रित प्रणाली विकसित करून एकच ॲप चालू करून शिक्षकांना कमी वेळेत हे सर्व ऑनलाईन कामे करता यावीत यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विजय रापतवार, अध्यक्ष श्री पांडुरंग नरवडे व सचिव श्री विष्णू सरवदे यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.
शिक्षकांना हाताळाव्या लागत असलेल्या या ॲप्स मध्ये सरल,शालार्थ,मध्यान्ह भोजन,प्रेरणा,प्रेरणा डीबीटी,महाडीबीटी, दीक्षा रीड अलॉन्ग, निपुण प्लस, शारदा उल्हास भारत,समर्थ पोर्टल, विनोबा ॲप, कर्मयोगी, हरितिमा, इको क्लब,एस आधार उमंग ॲप, महास्कूल स्वच्छ सर्वेक्षण,फीट इंडिया,सूक्ष्म कवच, ज्ञान समीक्षा,परख अशा जवळपास एकूण 40 ॲप्सवर शिक्षकाकडून दररोज हजेरी, सर्वेक्षण अहवाल आणि विविध शासकीय माहिती दररोज अनिवार्य पणे भरावी लागते.
विविध शासकीय व्हाट्सअप ग्रुप करून दिवसभर वेगवेगळे शासकीय परिपत्रके व आदेश, त्यातच वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळ्या लिंक येतात त्यामुळे शिक्षक पूर्ण वेळ या ऑनलाईन काम व व्हाट्सअप ग्रुप मुळे मोबाईलवर व्यस्त असल्यासारखे असतात त्यात या ॲप्स चे सर्वर चालले नाही तर माहिती वेळेत गेली नाही तर कारवाईची भीती असते या तणावांमध्येच शिक्षक दिवसभर असतात या सर्व कामाचा परिणाम अध्यापनावर होत आहे, त्यामुळे शासनाने हे सर्व ॲप्स एकत्रित करून नवीन डिजिटल प्रणाली विकसित करावी व हवी असलेली माहिती आपोआप या ॲपवरून वेगवेगळ्या योजनेसाठी स्वीकारली जाईल अशी काही व्यवस्था करावी जेणेकरून शिक्षकावरील या ऑनलाइन कामाचा ताण कमी होईल अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने अध्यक्ष श्री विजय रापतवार उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे व सचिव श्री विष्णू सरवदे यांनी केली आहे.
