
*स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन सुरू करा ; मागणीसाठी आमरण उपोषण*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील बंद असलेले सीटी स्कॅन मशीन तात्काळ सुरू करा या प्रमुख मागणीसाठी टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख कोंडीराम पवार यांनी मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी टायगर ग्रुपच्या आमरण उपोषण आंदोलनास वाढता पाठिंबा मिळत आहे तरी पण आज तिसरा दिवस असून उपोषण कर्त्याची तब्बेत खालावली असून प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंदच आहे. त्यामुळे या रूग्णालयावर अवलंबून असलेल्या असंख्य गोरगरीब, वंचित, बहुजन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रूग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत निवेदन देवून ही आपल्या प्रशासनाकडून सीटी स्कॅन मशीन सुरू करण्यात आली नाही. म्हणून या निषेधार्थ टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख कोंडीराम पवार यांनी मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. याबाबत त्यांनी अधिष्ठाता (स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई, जि.बीड.) यांना याच महिन्यात ०६/१०/२०२५ रोजी पत्र दिले होते. परंतु, अद्याप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा एकदा २७/१०/२०२५ रोजी लेखी पत्र देऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. याबाबत पवार यांनी अधिष्ठाता दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आम्ही टायगर ग्रुपच्या वतीने आपणांस निदर्शनास आणून कळवू इच्छितो की, आपल्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय, अंबाजोगाई येथील सीटी स्कॅन मशीन हे मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या रूग्णालयावर अवलंबून असलेल्या असंख्य गोरगरीब, वंचित, बहुजन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे तात्काळ सीटी स्कॅन मशीन सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे परिसरातील रूग्णांना आवश्यक असलेल्या या वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. सीटी स्कॅनची आवश्यकता असलेल्या रूग्णांना जवळच्या खाजगी सीटी स्कॅन वाल्यांकडे जावे लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या उपचारांसाठी विलंब होत आहे, आर्थिक लुट आणि मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी आपण त्वरित या समस्येची दखल घेऊन सीटी स्कॅन मशीनची दुरूस्ती करावी किंवा रूग्णांच्या सोयीसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी विनंती आम्ही आपल्या कार्यालयास दिलेल्या संदर्भीय निवेदनात केली होती. आजपावेतो याबाबत आपल्या कार्यालयाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न करण्यात आल्याचे दिसून येत आहे. आम्ही केलेल्या मागणीनुसार तातडीने कारवाई व उपाययोजना झाली नाही म्हणून टायगर ग्रुपच्या वतीने उमेश भैय्या पोखरकर (मराठवाडा विभागीय अध्यक्ष, टायगर ग्रुप, महाराष्ट्र राज्य.) यांच्या नेतृत्वाखाली आपल्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय, अंबाजोगाई प्रशासनाविरोधात अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करीत आहोत. कोंडीराम भाऊ पवार यांच्या आमरण उपोषणाला भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, लोकजनशक्ती पार्टी (र) युवा चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, बापू उदार, पोलिस मित्र बहुउद्देशीय संस्था, बीडच्या अध्यक्षा सपना डहाळे, सचिव निखिल डहाळे यांच्यासह छाया शहाणे, कल्याणी गिरी, सुनिता जाधव, शितल गायकवाड, रमल गोरे, रेश्मा मारकळ, महादेव गव्हाणे आदींसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट घेऊन लेखी पाठींबा दर्शविला आहे. स्वारातीचे अधिष्ठाता यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रतिलिपी देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री), आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, बीड., उपजिल्हाधिकारी आणि पोलिस निरीक्षक, अंबाजोगाई यांना माहितीस्तव पाठविल्या आहेत. तर टायगर ग्रुपच्या आमरण उपोषण आंदोलनात तिरूपती अण्णा राठोड, रोहन महाराज कुलकर्णी, दीपक लामतुरे, स्वप्निल सोनवणे, बालाजी रूद्राक्ष, आकाश लोदगे, आदित्य देशमुख, योगेश जिरे, कृष्णा नरसिंगे, अक्षय धारेकर, योगेश आप्पा पोखरकर, शंभू देशमुख, संतोष उजगरे, अशोक गायके आदींसह मित्र, परिवार सहभागी झाला होता.
