
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील महात्मा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाईत शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा १९४ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व विविध समाजोपयोगी, प्रबोधनपर उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. या निमित्त अभिवादन रॅली, मी सावित्री बोलतेय – एकपात्री नाट्यप्रयोग, १२५ मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वरानंद वाद्यवृंद सादरीकरण, दिनदर्शिका प्रकाशन आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले.

जयंती उत्सवासाठी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय, संत सावता माळी नगर येथे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सेवा संघाचे माजी सचिव मेजर शांतिनाथ बनसोडे, डॉ.सुरेश अरसुडे, वसंतराव घोडके, प्रकाश जिरे, मुंजा जिरे, राम जिरे, लक्ष्मणराव पाथरकर, गणेश राऊत, केरबा जिरे, अंकुश घोडके, बळीराम चोपणे, अनंत अरसुडे आदींसह ज्येष्ठांच्या हस्ते श्री गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेतील सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुपारी ३ वाजता सावित्रीमाई फुले चौक येथे प्रतिभावान गायक प्रदीप चोपणे प्रस्तुत स्वरानंद ऑर्केस्ट्रा व संचाने प्रबोधनपर आणि राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

त्यानंतर शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरूवात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले चौक येथून झाली. व ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक ते संत सावता माळी चौक मार्गे निघून स्वयंवर मंगल कार्यालय, संत सावता माळी चौक येथून निघून अभिवादन रॅलीचा समारोप स्वयंवर मंगल कार्यालय येथे झाला. या सर्व चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महात्मा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने स्वयंवर मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते १२५ मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आणि सेवा संघाच्या क्रांतीसुर्य दिनदर्शिका-२०२६ चे प्रकाशन ही करण्यात आले. तद्नंतर प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी (विभागप्रमुख, नाट्यशास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई) यांनी मी सावित्री बोलतेय हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. या एकपात्री विचार नाट्यप्रयोग सादरीकरणातून सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवनप्रवास दर्शविला. तसेच यावेळी प्रा.डॉ.विजयाताई इंगोले, सुरेखाताई म्हेत्रे (चोपने), कु.योगेश्वरी बालाजी जाधव यांचा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हे सर्व उपक्रम, कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालय, संत सावता माळीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब मसने यांनी केले. तर सुत्रसंचालन शिवनंदा घोडके यांनी केले. उपस्थितांचे आभार सेवा संघाचे सचिव राम घोडके यांनी मानले. ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सवाच्या यशस्वितेसाठी संतोष राऊत, सिद्राम घोडके, विष्णु राऊत, प्रकाश बलुतकर, ज्ञानेश्वर जिरे, रमेश जिरे, बालासाहेब माळी, डॉ.फुटाणे सर, विठ्ठल शिंदे, दत्तात्रय सत्वधर, गणेश जाधव, मंगेश बलुतकर, गणेश दादा जाधव, पंकज राऊत, आकाश चोपने, कृष्णा मसने, नवनाथ माळी, शरद माळी, रोहन माळी, महेश सपाटे, अशोक बलुतकर, प्रदीप जिरे, नंदकुमार बलुतकर, आरसुडे मॅडम, सागर साखरे, सुरज राऊत, डॉ.सुशिल शिंदे, प्रविण चोपने, बालाजी घोडके, सुधीर डाके, पवन जिरे, पवन घोडके, अमोल घोडके, सुमित धनवडे, अनंत मसने, श्रीनिवास मसने, गणेश डाके, अभिजीत जिरे, सुमित राऊत, ऋषिकेश पाथरकर, गोविंद पाथरकर, अमोल जिरे, विजय जिरे, भागवत जिरे, अनिकेत घोडके, दिनेश घोडके, तुषार करपुडे, अशोक जिरे, बालासाहेब जिरे आदींसह अनेकांनी परीश्रम घेतले. महात्मा फुले सेवा संघ, अंबाजोगाईचे पदाधिकारी व सदस्य आणि सर्व सन्माननीय समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सव उत्साहात साजरा केला.
