
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केलेल्या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात मंगळवार, दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी ‘दर्पण दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पत्रकारांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ. अतुल देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगांवकर, जेष्ठ पत्रकार विरेंद्र गुप्ता, दत्ता अंबेकर, शिवकुमार निर्मळे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुढे उपस्थित पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये अविनाश मुडेगांवकर, विरेंद्र गुप्ता, दत्ता अंबेकर, शिवकुमार निर्मळे, प्रशांत बर्दापूरकर, दिलीप अरसुळ, गजानन मुडेगांवकर, व्यंकटेश जोशी, प्रशांत लाटकर, रमाकांत पाटील, परमेश्वर गित्ते, राहुल देशपांडे, अभिजीत लोमटे, गोविंद खरटमोल, प्रदीप तरकसे, सतीष मोरे, अभिजीत गुप्ता, वैभव चौसाळकर, अशोक दळवे, अभय जोशी, सुरज सूर्यवंशी, प्रशांत मस्के, उत्तरेश्वर शिंदे, अनंत कुलकर्णी, योगेश डाके आदी पत्रकारांचा समावेश होता. काही पत्रकारांचा प्रत्यक्ष कार्यक्रमात तर काहींचा नंतर प्रत्यक्ष भेटून सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रदीप तरकसे, दत्ता अंबेकर व शिवकुमार निर्मळे यांनी पत्रकारितेतील आपल्या अनुभवांची मांडणी केली. पत्रकारितेच्या प्रारंभिक काळातील आव्हाने, सत्यनिष्ठा जपण्याची जबाबदारी आणि आजच्या सोशल मीडियाच्या युगातील बदल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अनुभवातूनच खरी पत्रकारिता शिकता येते; त्यासाठी चौफेर अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक अनंतराम कोपले शुभेच्छा देताना म्हणाले की, शाळेतील उपक्रम, घडामोडी व सामाजिक कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. या कार्याबद्दल त्यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अतुल देशपांडे म्हणाले की, आजची पत्रकारिता अत्यंत आव्हानात्मक झाली आहे. खरे पत्रकार कोण, हा प्रश्न निर्माण होतो; मात्र आजही काही पत्रकार निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करताना दिसतात. विविधांगी व मूल्याधिष्ठित पत्रकारिता ही काळाची गरज आहे. अंबाजोगाई शहराला पत्रकारितेची समृद्ध परंपरा असून ती जपण्याचे कार्य पत्रकारांनी केले असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे, पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख व कार्यक्रम प्रमुख श्रीकांत देशपांडे, प्रसिद्धी प्रमुख केदार वाघमारे यांच्यासह अनिल राठोड, सतीष वांगे, सतीष बलुतकर, अक्रूर यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.
