अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
डॉ. अशोकराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त होळ येथे मोफत आरोग्य शिबिर होळ (ता. केज, जि. बीड) : मा. डॉ. अशोकरावजी थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होळ येथे भव्य नेत्र तपासणी, दंत तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मारुती मंदिर, होळ येथे पार पडणार आहे.या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी, दंत तपासणी करण्यात येणार असून ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल अशा रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय, केज येथील रुग्णकल्याण समितीचे सदस्य लालासाहेब शिंदे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विमा सोसायटीचे संचालक तथा समाजसेवक डॉ. अशोक दादा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रुग्णसेवेच्या माध्यमातून लाखो गरजू नागरिकांना आधार देणारे आणि सर्वसामान्य जनतेसाठी सदैव सहज उपलब्ध असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. अशोक दादा थोरात यांची ओळख आहे. आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना उपचारांची संधी मिळाली असून त्यांच्या कार्यातून समाजातील असंख्य लोकांना आरोग्यसेवेचा आधार मिळत आहे.
त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कुटुंबांना नवी आशा आणि बळ मिळाले आहे. समाजसेवा, साधेपणा आणि जनतेप्रती असलेली त्यांची बांधिलकी ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक मानणाऱ्या कार्यकर्त्यांनीही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
