अंबाजोगाई प्रतिनिधी : धानोरा (खुर्द) येथून अंबाजोगाईकडे येत असताना एका दुर्दैवी अपघातात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व महादेव ढगे (वय २०, रा. धानोरा खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व ढगे हे अंबाजोगाईकडे येत असताना त्यांचा वाहनावरचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या शिवाई बस (क्रमांक एमएच ४९ बीझे ९५८१) ला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अथर्व यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही तत्काळ कळविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे धानोरा खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
