अंबाजोगाई पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आज पर्यावरणाचे अवचित्त साधत अंबाजोगाई पोलीस स्टेशन मध्ये झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात आला.
अंबाजोगाई अशोक दळवे
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व परिसर सुशोभीकरणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

अंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस पूर्वी कचराकुंडी असलेल्या जागेची स्वच्छता करून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये सुमारे ४५ आंब्याची, ३० नारळाची तसेच १० चिकूची झाडे लावून परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक भागवत कांदे, पोलीस अंमलदार रवीकुमार केंद्रे, पोलीस हवालदार भागवत नागरगोजे, बाळासाहेब पारवे, हनुमंत चादर, तेजस वाहुळे, सुशांत गायकवाड, संतोष बदने, दत्तात्रय इंगळे, अमोल गायकवाड, हनुमंत लाड आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, कचराकुंडीचे रूपांतर हिरव्यागार परिसरात करण्याच्या या प्रयत्नाला सर्व स्तरांतून प्रशंसा मिळत आहे.
