बीड प्रतिनिधी :शहरातील यशोदा हॉटेल परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा एकूण ४०,००० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोनि.शिवाजी बंटेवाड यांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सपोनि जनाबाई सांगळे यांच्यामार्फत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शहरातील हॉटेल यशोदा परिसरात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान संशयिताच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तुकाराम गंगाधर करांडे (वय २८), रा. खडकी देवळा,ता.वडवणी, जि.बीड (सध्या रा. स्वराज्यनगर, बीड) असे आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत ,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम,पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष बीड कडील सपोनि श्री.सांगळे,पोह,श्री.शिंदे,श्री.येवले,श्री.जाधव,श्री.चौरे,श्री.कारले व श्री.गर्जे तसेच स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोउपनि श्रीराम खटावकर, पोअ.मनोज परजणे,अशफाक सय्यद यांनी केली.
