पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्तरावर काम करण्याची मिळाली संधी; सर्व मान्यवरांचे मानले आभार
अंबाजोगाई प्रतिनिधी :–
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी श्री. विलास भाऊसाहेब आंबाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर पक्षाच्या संघटनात्मक कार्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.

तसेच संसदरत्न खासदार मा. श्रीकांतजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे प्रमुख मा. श्री. प्रीतम शेठ धारिया, शिवसेना उपनेत्या मा. आमदार संगीताताई ठोंबरे, मराठवाडा प्रमुख मा. विनोद भाऊ नेमाडे, बीड जिल्हाप्रमुख मा. सचिन भाऊ मुळूक आणि महिला जिल्हाप्रमुख डॉ. प्रतिभाताई अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विलास भाऊसाहेब आंबाड यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीनंतर विलास भाऊसाहेब आंबाड यांनी सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मराठवाडा विभागात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
