अंबाजोगाई (प्रतिनिधी):- भारत सरकारच्या सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या (DRUCC) सदस्यपदी अमर देशमुख यांची सन २०२६ ते ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या दि ३० सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार अमर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र नुकतेच अमर देशमुख यांना प्राप्त झाले आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या शिफारसिनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती (Divisional Railway Users’ Consultative Committee – DRUCC) मध्ये सन २०२६ ते ऑगस्ट २०२८या कालावधीसाठी प्रतिनिधित्व करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर दगडूसाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमर देशमुख यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्या माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी जिल्हा परिषद सभापती राजेसाहेब देशमुख, संजय भोसले, दिपक शिंदे,ऍड इस्माईल गवळी, शिवसेनेचे मदन परदेशी, अंकुश हेडे, व्यंकटेश चामणर , भगवान ढगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केल्या जात आहे.
अमर दगडूसाहेब देशमुख यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर (DRUCC) नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केवळ पदापुरते मर्यादित न राहता रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविणे, मराठवाड्यातील रेल्वे सुविधा वाढविण्यासाठी पाठपुरावा करून बीड जिल्ह्याच्या रेल्वेविषयक प्रश्नांना प्रशासनापर्यंत पोहोचविन्यासाठी लक्ष केंद्रित करावे असेही या नियुक्ती पत्रात उल्लेखित करण्यात आले आहे. विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती (DRUCC) ही रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या गरजा, अडचणी आणि सुविधा यांबाबत सूचना देण्यासाठी व प्रश्न मांडण्यासाठी कार्य करण्यासाठी ही सल्लागार समिती कार्यरत असते.
*मिळालेल्या संधीचे सोने करत रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत प्रश्नासाठी काम करणार- अमर देशमुख*
जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी माझयावर टाकलेला विश्वास तथा रेल्वे प्रशासनाने टाकलेली जीम्मेदरी पूर्ण करण्यासाठी आपण झोकून काम करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अमर देशमुख यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत सामान्य रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत प्रश्नासाठी आपण काम करणार असल्याचे देखील देशमुख यांनी स्पष्ट केले. ज्यामध्ये रेल्वे प्रवाशांच्या अडचणींची माहिती गोळा करणे , रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतीक्षालये आणि आसन व्यवस्थेचा आढावा घेणे.ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांच्या अडचणी मांडणे , रेल्वे गाड्यांच्या वेळा, थांबे, डबे आणि प्रवासी सुविधांबाबतच्या मागण्या प्रशासनासमोर ठेवणे, नवीन गाड्या, अतिरिक्त थांबे किंवा रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुराव्यांसह प्रस्ताव सादर करणे, प्रवाशांच्या तक्रारी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यावर झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणार असल्याचे अमर देशमुख यांनी नमूद केले. खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आपणावर टाकलेल्या विश्वासाबद्दल अमर देशमुख यांनी खासदार सोनवणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
