गावाच्या एकजुटीला आणि सामूहिक प्रयत्नांना यश; ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांचे सर्वत्र अभिनंदन
अंबाजोगाई प्रतिनिधी :–
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२०२६ अंतर्गत बीड जिल्ह्यातून चनई गावाने तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे चनई गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशामागे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटातील सर्व महिला तसेच समस्त ग्रामस्थांचे मोलाचे योगदान आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने, समन्वयाने आणि सहकार्याच्या भावनेतून केलेल्या प्रयत्नांना हे यश मिळाले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी दाखवलेली तत्परता, लोकसहभाग आणि एकजूट कौतुकास्पद आहे. या अभियानात चनई गावाने मिळविलेल्या यशाबद्दल ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटातील महिला भगिनी आणि समस्त ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
गावाची एकजूट, विकासाची साथ आणि सामूहिक प्रयत्नांचे यश म्हणजे चनई गावाचा तृतीय क्रमांक!
