अहिल्यादेवी नगर

*तरुणाचे शीर धडावेगळे , दोन हात, एक पाय तोडला शिरूरसह श्रीगोंदा तालुका हादरला!*

अहिल्या नगर (प्रतिनिधी)

तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय पूर्ण तर एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आळढून आल्याने शिरूर -श्रींगोदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून बीड व अहिल्या नगर सीमेवर निदर्शनास आलेल्या या प्रकाराने या राज्यात चाललंय काय हा प्रश्न नागरिकांतून विचारला जातोय.

 

याबाबत सविस्तर माहीती अशी की, शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी 18 ते 22 वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरी मध्ये आढळून आला आहे. या मृत्यू देहाचे शीर, दोन हात ,व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळून आल्या आहे. हा मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी ता. श्रीगोंदा येथील शिरूर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

 

जीवाचा थरकाप उडवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली आहे.मृतदेहाचे शीर दोन्ही हात व पाय अद्याप सापडलेला नाही. नक्की हा मृत्यू देह कोणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडी ता .श्रीगोंदा येथील माऊली सतिश गव्हाणे हा 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुण ७ मार्च २५पासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते परशुराम गव्हाणे यांनी सांगितले. याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

 

परंतु हा मृत्यू देह नक्की त्याचा का आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे आज मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली असून, दाणेवाडी येथे सापडलेला मृत्यू देह हा त्यांच्यात मुलाचा असू शकतो परंतु मृतदेहाचे शीर, दोन्ही हात, उजवा एक पाय नसलेला , डावा पाय अर्धा तुटलेला अवस्थेत सापडल्याने कुटुंबही द्विधा मनस्थिती मध्ये आहे.

 

मिसिंग फिर्यादी बाबत चौकशी सुरू असून सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जमा करण्याचे काम सुरू आहे. दाणेवाडी येथील मृतदेह बाबत माहिती गोळा करण्याचे काम आहे सुरू असून, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा पोलीस, अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तपासासाठी रवाना झाली आहे.

संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक शिरूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893907
error: Content is protected !!