अंबाजोगाई

पृथ्वीराज साठेंच्या विजयासाठी संकेत मोदी देखील लागले कामाला

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- केज विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी संकेत राजकिशोर मोदी हे अंबाजोगाई शहरात कार्यरत झाले आहेत. पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी संकेत मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवार दि ११ रोजी अंबाजोगाई शहरातील प्रभाग १ मधील ढोर गल्ली, मंडी बाजार, अरीश कॉलनी, बाराभाई गल्ली, झरगर गल्ली, काळम पाटील गल्ली, गांधीनगर गुरुवार पेठ भागात केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
या भेटीदरम्यान त्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी ,महिला, वृद्ध आणि युवकांचा संकेत राजकिशोर मोदींव पृथ्वीराज साठे यांच्याबद्दल भरभरून आस्था आणि प्रेम व उत्साहमोठया प्रमाणावर दिसून आला. अंबाजोगाई शहरातील मतदारांचा हा उत्साह पाहून पृथ्वीराज साठे यांच्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. याप्रसंगी येत्या २० नोव्हेंबर रोजी तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन संकेत मोदी यांनी मतदारांना केले आहे. या प्रसंगी संकेत मोदी यांच्या सोबत सुधाकर टेकाळे, शाकेर काझी, खलील जाफरी, सचिन जाधव, अनुप जाजू, प्रणव लोढा, गौरव उपाध्यय, कन्हैया सारडा, रोशन पांचाळ, मनोज टेकाळे,रोहित देवकर, साईराज देवकर, शेख सोहेल, राजेश चव्हाण, शुभम पवार, काशिनाथ चव्हाण, अक्षय चव्हाण, प्रसाद कोंबडे, संतोष खरटमोल, अक्षय खरटमोल, शौर्य चव्हाण, अनिकेत शिनगारे,रोहित देवकर, योगीराज धोत्रे, रोहित हुलगुंडे, रोशन पांचाळ,शुभम लखेरा,साई राज धोत्रे, संतोष चव्हाण, सौफियान शेख,अस्लम शेख यांच्यासह अनेक सहकारी कार्यकर्ते या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893907
error: Content is protected !!