अंबाजोगाई

*अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मटका गुटख्या सह सर्व प्रकारच्या अवैध धंद्याचे थैमान* *नवनीत कॉवत साहेबांनी स्वतंत्र पथक पाठवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता*

*नवनीत कॉवत साहेबांनी स्वतंत्र पथक पाठवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी मध्ये पोलीस निरीक्षक महोदयांच्या कृपा आशीर्वादाने मटक्या गुटख्या सह सर्व प्रकारच्या अवैध धंद्याने थैमान घातले असुन नव्याने पदभार स्वीकारलेले बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत साहेब यांनी स्वतंत्र पथक पाठवून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मागील अनेक महिन्या पासून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी मध्ये मटका, गुटखा, पत्याचे क्लब, गांजा, घावटी दारू, गुडगुडी, बिंगो या सारखे खेळ या सह अन्य प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमानावर फोफावले असून क्रीडा मंडळाच्या नावाखाली बिनधास्त पणे पत्याचे क्लब सुरू आहेत. हे धंदे चालवणाऱ्या कडून मलिदा घेऊन सुरू असलेल्या अवैध धंद्या मुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आसून हे अवैध धंदे चालवणारी मंडळी नवयुवकाना व्याजाने पैसे देतात आणि वेळेत पैसे परत न दिल्यावर त्यांना विविध प्रकारे टॉर्चर करतात या मुळे काही युवकांनी आपले जीवन संपवल्याच्या तर काहींनी गांव सोडून गेल्याच्या घटना या पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या आहेत.
मागील 8 दिवसा पूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी अंबाजोगाई शहरा नजीक ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बुट्टेनाथ दरी मध्ये असलेल्या बनावट दारू बनवण्याच्या कारखान्यावर धाड टाकून आतील यंत्रसामग्री सह 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्या मुळे या पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आणि प्रश्न उपस्थित झाला तो आज पर्यंत या कारखान्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यवाही का केली नाही.
बुट्टेनाथ हा परिसर येथील डोंगर दऱ्यात असून या परिसरात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या कृपेने असंख्य घावटी दारू बनवण्याच्या भट्ट्या सुरू आहेत ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मात्र या परिसरात चक्क बनावट दारू बनवण्याच्या कारखाणा उघडकीस येतो यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची धाड पडते यात या पथका कडून 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला जातो आणि सुरू असलेल्या या कारखान्याची खबर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना नसावी ही गोष्ट शक्यच नाही.
अंबाजोगाई ग्रामिण पोलीसांच्या कृपेने बुट्टेनाथ परिसरा सह राडी तांडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू बनवण्याच्या भट्ट्या आहेत. या भट्ट्यावर थातूर मातूर कार्यवाही करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी आज पर्यंत या बनावट दारूच्या कारखान्यावर कार्यवाही का केली नाही? हा प्रश्न असून हा कारखाना चालवणाऱ्या मंडळीने ग्रामीण पोलीस व अधिकारी यांचे हात ओले केले आहेत की बांधले आहेत हे काही समजायला तयार नाही.
विशेष म्हणजे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे वाल्याना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांचे ही अभय आहे की काय कोण जाने कारण हे अधिकारीही कधीच या परिसरात कार्यवाही करताना दिसत नाहीत.

*ग्रामीण पो स्टेचे पोलीस निरीक्षक म्हणजे भोपळ्यात बी खुशाल*

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी मधील हे सर्व अवैध धंदे कोणाच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहेत हे न समजण्या एवढे दुध खुळे सुजाण नागरिक नाहींत. या संदर्भात पोलीस निरीक्षक महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतरही हे महोदय चक्क म्हणतात “इथं काहीच नाही हो, उगीच वरून टाकलं म्हणून ड्युटी करत आहे. मी तर बदली कधी होते याची वाट पाहतोय” त्यांच्या तोंडून वारंवार निघणारे हे वक्तव्य म्हणजे नैराश्य दाखवणारे असले तरी हे नैराश्य “नौ सो चुहे खाकर बिल्ली हज को चली” असे असुन पोलीस स्टेशन हद्दीत सर्व अवैध धंदे आलबेल चालू ठेऊन हे पोलीस निरीक्षक मात्र “भोपळ्यात बी खुशाल” आहेत हे सत्य नाकारून चालत नाही. त्यामुळे एक चॅलेंज स्वीकारून नव्याने बीड जिल्ह्यात दाखल झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत साहेब यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याच्या विरोधात कार्यवाही सुरू केली असून या कार्यवाहीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नवनीत कॉवत यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत
स्वतंत्र पथक पाठवून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यास सुरवात केल्यावर मात्र हे पोलीस निरीक्षक महोदय बदलीची वाट न पाहता स्वतः हुन बदली करण्याचा प्रयत्न करतील हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893907
error: Content is protected !!