अंबाजोगाई

अंबाजोगाईचा आका कोण ? महादेव “आण्णा” च्या फेसबुक पोस्टने खळबळ, सर्वत्र चर्चेला उधाण असं असल्यास शहरासाठी धोक्याची घंटा

 


अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एकेकाळी अंबाजोगाई शहरातील चळवळ पुढे नेण्यात ज्यांचा वाटा आहे असे सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक महादेव आण्णा  आदमाने यांनी अंबाजोगाई शहरातील वाढत्या गुंडगिरी व बिघडत चाललेल्या वातावरणावर केलेल्या फेसबुक पोस्ट मुळे खळबळ उडाली असून आंबजोगाई चा आका कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.
संतोष देशमुख यांच्या हात्ये नंतर बीड जिल्ह्यातील विशेष करून परळी मधील गुंडगिरीचा राज्यभरात व बाहेर डंका वाजला हे सर्वश्रुत असून याच गुंडगिरीचे लोन अंबाजोगाई मधे पोचलेले आहे.
मागील काही महिण्या पासून अंबाजोगाई शहरातही गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली असून गुंडाच्या टोळ्या शहरात दहशत निर्माण करत आहेत आणि याच टोळ्यांची येथील राजकीय नेते मंडळी कडून पाठराखण होत असल्याची त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रसद पुरवली जात असल्याची चर्चा आता लपून राहिलेली नाही आणि त्यामुळेच की काय गुंडाच्या 4 ते 5 टोळ्या शहरात लाठ्या, काठ्या, घावटी कट्टे, आदी, तीक्ष्ण हत्याराचे, कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न, सायलेन्सर लावलेल्या दुचाकी भरधाव वेगाने गावभर फिरवून प्रदर्शन करत आपला वचक निर्माण करू पहात आहेत.
त्यामुळेच की काय एकेकाळी अंबाजोगाई शहरातील चळवळ पुढे नेण्यात ज्यांचा वाटा आहे असे सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक महादेव आण आदमाने यांनी आज अंबाजोगाई शहरातील वाढत्या गुंडगिरी व बिघडत चाललेल्या वातावरणावर दोन फेसबुक पोस्ट केल्या असून यातील एका पोस्ट मधे त्यांनी लिहल आहे की,
“अंबाजोगाई शहरातील काही प्रतिष्ठित पुढारी गुंडांना जे की खंडणी, भूमाफिया, खून,खुनाचा प्रयत्न,चोऱ्या,गांजा विकणारे, अपहरण करणानारे,लोकांना आर्थिक त्रास देणाऱ्या लोकांना ताकत देत आहेत” तर दुसऱ्या पोस्ट मधे लीहल आहे की,
पोलिस स्टेशन मध्ये गुंडांची,नंबर दोनच्या धंद्यावल्यांची शिफारस करणाऱ्या लोकांची स्टेशन डायरीला नोंदी घ्या”
महादेव “आण्णा” आदमने यांच्या  या दोन्ही फेसबुक पोस्ट मुळे शहरात खळबळ उडाली असून एकूणच यातून अंबाजोगाईचा “आका” कोण हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहर वासिया साठी धोक्याची घंटा असून महादेव आण्णा आदमने यांच्या फेसबुक पोस्ट नुसार येथील राजकीय मंडळीला आपले चारित्र्य स्वच्छ ठेवायचे असेल तर आपल्या भोवताली असलेल्या कार्यकर्त्यांचा इतिहास तपासण्याची व नंतरच त्याचा सहवास वाढवण्याची आवश्यकता आहे. प्रशासनानेही सतर्क होउन यावर वेळीच पायबंद न घातल्यास शहरात मोठा अनर्थ घडेल व आज जी परळीच्या गुंडगिरीची राज्यभरात चर्चा होत आहे त्यात अंबाजोगाईची भर पडेल व शहर वासियांना मानसिक त्रास सहन करावा लागेल हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893908
error: Content is protected !!