अंबाजोगाई

डॉ. अब्दुल कलाम ज्युनिअर साईनटीस्ट स्पर्धा परिक्षेचा सन 2024 बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न पठाण मदिहा फातेमा रियाज खानने सुवर्णपदकासह भारतातील टॉप 5 मध्ये स्थान मिळवले

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
डॉ. कलाम ज्युनिअर साईनटीस्ट स्पर्धा परिक्षा संदर्भात देशात विविध राज्यामध्ये व इतर देशात NCRT बेसड् अभ्यासक्रमावर आधारीत स्पर्धा परिक्षा इकरा एज्युकेशनल एक्सलन्स, अकोलाच्या वतीने स्पर्धा परिक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शाहीन एज्युकेशनल इन्सीट्युटशन्स ग्रुप बीदर (कर्नाटक) येथे संपन्न झाले. या परिक्षेत बीड जिल्ह्यातील बार्शीनाका येथील एडम्स इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी कु. पठाण मदिहा फातेमा रियाजखानने 81.89% गुण मिळवून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे. भारतातील एकूण 25 सुवर्णपदक विजेत्यामध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शाहिन एकॅडमीचे संचालक खदीरभाई व इकरा एज्युकेशनल एक्सलन्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंमद शकील इंजिनिअर, मोहम्मद अली हैदर आणि संस्थेच्या अधिकारी, पदाधिकारीच्या हस्ते हे पारितोषीक विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, इकरा एज्युकेशनल अकॅडमी ऑफ एक्सलेन्स गेल्या 30 वर्षापासून भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गरीबांच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धाद्वारे मदत करीत आहे आणि देशभरात गुणवंत विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी प्रदान करीत आहे. 2014 मध्ये भारत सरकारने वननेशन वन अभ्यासक्रम आणि वन प्रश्नपत्रिका अशी संकल्पना मांडली ज्यामुळे राज्यस्तरीय अभ्यासक्रम नजरअंदाज झाले. इकरा अकॅडमीचे प्रमुख डॉ. महंमद शकील इंजिनिअर हे विविध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उर्दू व इंग्रजी माध्यमातुन NCRT अभ्यासक्रमाच्या आधारे IIT, JEE, NEET, UPSC, MPSC अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करीत आहेत विद्यार्थ्यांमध्ये NCRT च्या अभ्यासक्रमाबद्दल रुची निर्माण व्हावी व समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाणिव जागृती व्हावी या हेतुने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक परिक्षा घेऊन देशातुन व परदेशातुन एकूण 25 स्वर्णपदक विद्यार्थ्यांना घोषीत करतात. ही परिक्षा 4 टप्यामध्ये घेण्यात येते.
1) पहिला टप्पा – ऑनलाईन परिक्षा, 2) दुसरा टप्पा – ऑनलाइन आणि लेखी परीक्षा, 3. तिसरा टप्पा – फक्त मौखिक परी क्षा (फोनद्वारे), 4. चौथा टप्पा – लेखी व मौखिक दोन्ही प्रकारची परीक्षा या परिक्षेत सौदी अरेबिया, भारतातील महाराष्ट्र जम्मु-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल इत्यादी ठिकाणांहून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. एकूण 540 शाळांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिक्षेत सहभाग नोंदवला होता. ज्यात 5 वी ते 7 वी प्रथम ग्रुप आणि 8 वी ते 10 द्वितीय ग्रुप असे दोन गट या परिक्षेत करण्यात आले होते. आणि दोन्ही गटामधुन एकूण 25 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 25 सुवर्णपदके शाहिन एज्युकेशनल ग्रुपच्या वतीने त्यांच्या धर्तीवर देशातील विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले व विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यकाळात विविध क्षेत्रातील आडीअडचणीला सामोरे जातांना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी वचनबद्ध देण्यात आले. पठाण मदिहा फातेमा रियाजच्या या उल्लेखनीय पेशाबद्दल हिच्या कुटूंबांसह डॉ. पठाण सिराज खान अरजू, काजी मकदुम, काझी रफियोद्दीन, काझी तकीयोद्दीन, जावेद पाशा, पठाण अय्युबखान तुराबखान, जलीलखान, तसेच ॲडम्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलचे माजी प्राचार्य मोहम्मद मुनिरउज्जमा देशमुख व सध्याचे प्राचार्य असमत बाजी, राशेद जागीरदार, मुजीब सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनीही तिला अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893907
error: Content is protected !!