अंबाजोगाई

*माथाडी कामगारांचा संप, स्वत धान्य दुकानदारांच्या पथ्यावर वेळेवर धान्य मिळत नसल्याने ग्राहकांचा रोष; मुदतवाढ मिळत नसल्याने दुकानदार अडचणीत*

अंबाजोगाई प्रतिनिधी: – राज्यातील माथाडी कामगारांचा 1 ते 22 मार्च संप पुकारल्यामुळे या महिन्यातील धान्य वाटप वेळेवर न झाल्यामुळे ग्राहकांचा रोष व्यक्त केला जात असून या सर्व गोष्टीला जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थितीत होत आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे धान्य उशिरा प्राप्त झाले असल्यामुळे व अंबाजोगाई गोदामातर्गंत 13 स्वत धान्य दुकानदारांना आजपर्यंत धान्य प्राप्त न झाल्यामुळे त्याला मुदतवाढ मिळावी या मागणीचे निवेदन ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन पुणे अंतर्गत अंबाजोगाई शाखेने तहसीलदारांना देण्यात आले आहे.

माथाडी कामगारांनी विविध मागण्यांसाठी 1 ते 22 मार्चच्या दरम्यान राज्यात संप पुकारला होता. त्यामुळे मार्च महिन्याचे धान्य एप्रिल मध्ये दुकानदाराला वेळेवर न मिळाल्यामुळे ग्राहकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. धान्य वाटपासाठी मुदतवाढ मिळत नसल्यामुळे दुकानदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

मार्च महिन्यातील माथाडी कामगारांच्या संपामुळे शासकीय गोदामातील धान्य उशिरा प्राप्त झाल्यामुळे तालुक्यातील तेरा गोदातर्गत तेरा स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य प्राप्त झाले नाही. यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. मार्च 2025 रोजी मुदतवाढ न मिळाल्यास 100 टक्के धान्य वाटप ग्राह्य धरून मार्चचे धान्य मे महिन्यात देण्यात यावे. माहे नोव्हेंबर 2024 ते मार्च 25 पर्यंतचे स्वस्त धान्य दुकानादारांचे कमिशन देण्यात यावे. अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन पुणेच्या अंबाजोगाई शाखेने तहसीलदाराकडे केली आहे.

 

*मुदतवाढीसाठी प्रयत्न सुरू*

मार्च 2025 माथाडी कामगारांच्या संपामुळे 100 टक्के धान्य वाटप झाले नाही. त्याला मुदतवाढ मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार चालु आहे. शासनाच्या आदेशानुसार वाटप प्रणाली सुरू करण्यात येईल. – विलास तरंगे, तहसीलदार अंबाजोगाई

*ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे*

हमाल संपावर असल्याने धान्य वेळेवर पोहोंचत नसल्यामुळे दुकानदाराला ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी हमालांचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा. – मनोज मोदी, तालुकाध्यक्ष स्वत धान्य दुकानदार संघटना

 

*ई-पॉस मशिन बंद पडत असल्याने त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात*

सतत हमालांचा संप वारंवार ई-पॉस मशिन बंद पडणे, धान्य वेळेवर न मिळणे या बाबीमुळे ग्राहक व दुकानदार विविध समस्याला सामोरे जावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर उपाययोजना करण्यात याव्यात.- बालासाहेब देशमुख, सचिव स्वत धान्य दुकानदार संघटना

 

*मार्चऐंडला धान्य मिळाल्याने वाटप कसे करावे*

माहे मार्च 2025 चे धान्य 31 मार्चला प्राप्त झाले, 1 एप्रिलला कसे वाटप करावे कारण माहे मार्चचा डाटा एप्रिल मध्ये दिसत नाही. मार्चचे धान्य दिले गेले नसल्यामुळे ग्राहक दुकानदारांच्या अंगावर येत आहेत. यातील अडचणी दुर कराव्यात.- शिवाजी मुरकुटे, तालुका उपाध्यक्ष स्वतधान्य दुकानदार संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893901
error: Content is protected !!