अंबाजोगाई

*शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी बालाजी खैरमोडे यांची निवड*

अंबाजोगाई (प्रतिनीधी)-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथजी शिंदे शिवसेना प्रणीत बांधकाम कामगार सेनेच्या बीड जिल्हा प्रमुखपदी बालाजी खैरमोडे यांची निवड करण्यात आली. 

 

दिनांक 24 मे रोजी स्वारगेट (पुणे ) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शिव कामगार एकजूट मेळाव्यात शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे राज्य प्रमुख प्रितमशेठ धारिया,मराठवाडा प्रमुख विनोद नेमाडे यांच्या हस्ते बालाजी खैरमोडे यांना नियुक्तीपञ देण्यात आले.

बांधकाम कामगारांच्या न्याय व हक्कासाठी निर्माण करण्यात आलेले शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी खा.श्रीकांत दादा शिंदे ,शिवसेना सचिव संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नवनियुक्त पदाधिकारी शिवसैनिकांनी अथक परिश्रम करून तळागळातील कष्टकरी दुर्लक्षित कामगारांना बांधकाम योजने अंतर्गत जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन,कामगार सेनेचे राज्य प्रमुख प्रितमशेठ धारिया व मराठवाडा प्रमुख विनोद नेमाडे यांनी नियुक्त पञ देताना केले.

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या बीड जिल्हाप्रमुख पदी बालाजी खैरमोडे यांची निवड झाल्याबद्दल मराठी पञकार परिषदेचे बीड जिल्हाकार्याध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाउपप्रमुख गजानन मुडेगावकर, मारोती जोगदंड,सतिश मोरे,सालेम पठाण,अशोक कोळी,सुर्यकांत उदारे,शंकर गवळी,बालाजी भुजंगे,राजू पटाईत,नंदकुमार पिंगळे,सचिन धपाटे,संतोष बिचकुले,सचिन खरटमोल,काशिनाथ साबणे,अँड.नरेश साबणे,गणेश गव्हाणे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893902
error: Content is protected !!