अंबाजोगाई

*कृषी कन्यांचा एकची ध्यास ज्यामुळे वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन सोहळा गेला पूर्णत्वास..*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

शासकीय कृषी महाविद‌यालय, अंबाजोगाई अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक जागरुकता उपक्रमाअंतर्गत, कार्यक्रम समन्वयक डॉ विद्या तायडे व कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०४ जुलै रोजी जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, चनई ता. अंबाजोगाई येथे व कृषी महाविद्यालय अंबाजोगाईच्या रावेच्या विद्यार्थिनी (कृषि कन्या) यांच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम राबवण्यात आला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चनई गावच्या सरपंचा सौ रोहीणीताई प्रभाकर सावरे यांनी स्विकारले होते, कार्यक्र‌माचे प्रमुख अतिथी म्हणुन कृषि महाविदयालय अंबाजोगाई येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिपक लाखेडे सर, डॉ. जाधव सर, डॉ. बोंडे सर आणि चनई गावचे ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण देशमाने लाभले होते. आदरणीय पंडीत काकडे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभले होते.

याप्रसंगी नींब, उंबर, कारंज, इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न व्हावा म्हणून कृषी कन्या – कु. योगिता उगले, कु. ब प्रतिक्षा वाघचौरे, कु धनश्री कुंभार, कु प्रतिक्षा वाघमोडे, कु प्रतिक्षा बाबर, कु रोहीणी माने, कु शिंदे निकीता, कु. भुवनेश्वरी शिंगटे, कु.कल्पना धुळशेटे, कु.रोहीणी राऊत, कु. ज्ञानेश्वरी बेले, कु. अभिलाषा खोडके, कु. शितल काशिद, यांनी परिश्रम घेतले. तसेच गावचे उपसरपंच मा. अनिल शिंदे यांनी देखील वेळोवळी मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुः योगिता उगले हीने केले, प्रास्ताविकक रोहीणी राऊत हीने मांडले तर आभार धनश्री कुंभार हीने मानले या एका अपूर्व सोहळ्याला समस्त चनई गावचे ग्रामपंचायत सदस्य व गावकरी, शेतकरी मंडळी आणि शाळेतील सर्व शिक्षक व महिला शिक्षिका कर्मचारी तसेच सर्व विदयार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893872
error: Content is protected !!