अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे. आज २२ सप्टेंबर रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना व महापूजा होणार आहे. नंतर भाविक भक्तांना मंदिरात पुरुष भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात एकूण सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, दररोज सकाळी
नऊ आणि रात्री नऊ या वेळेत महिला व पुरुष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. भक्तांसाठी इतरही सोयीही पुर्ण केल्या असून दर्शन व्यवस्था पहाटे ४ ते रात्री ११ पर्यंत असणार आहे
विविध धार्मिक कार्यक्रम
योगेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यंदा संगीत भजन, गायन कीर्तन, जगदंबेचा गोंधळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाट पासून रात्रीपर्यंत भाविकांना योगेश्वरी देवीचे थेट दर्शन घेता येणार आहे. भाविकांना सकाळी ६ वाजेपर्यंत देवीस अभिषेक करता येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्तही ठे वण्यात येणार आहे. अशी माहिती योगेश्वरी देवल कमेटीचे सचिव गिरधारीलाल भराडिया यांनी दिली आहे.