अंबाजोगाई (प्रतिनिधी):–
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावर निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्या मध्ये स्थानिक मंडळीस प्राधान्य देण्याऐवजी परळी व केज तालुक्यातील व्यक्तींना प्राधान्य दिल्या कारणाने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर म्हटलेला आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र आज प्राप्त झाले असून या निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून खासदार बजरंग आप्पा सोनवणे तर सदस्य म्हणून आमदार नमिता ताई मुंदडा, वसंतराव मुंडे अंजलीताई घाडगे, संजीवनी देशमुख, राजकिशोर पापा मोदी व संजय दौंड यांची निवड करण्यात आली आहे.
वास्तविक स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाईच्या भूमीमध्ये असताना या अभ्यागत मंडळावर स्थानिकच्या मंडळीस प्राधान्य द्यावयास हवे होते. याशिवाय या रुग्णालयात स्थानिकचे अनेक सामाजिक कार्यकर्ते दिवस-रात्र अथक परिश्रम घेत असतात. निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यात केज तालुक्यातील तीन सदस्य अंबाजोगाई तालुक्यातील दोन सदस्य परळी तालुक्यातील दोन सदस्य असून या अभ्यास मंडळामध्ये एकाही सामाजिक कार्यकर्त्याला आणि स्थानिकच्या पत्रकारास प्राधान्य दिले गेलेले नाही.
एकूणच अभ्यास मंडळाचे रचना पाहता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट व भाजपाचा प्रत्येकी एक सदस्य वगळता उर्वरित चार सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असून एक सदस्य हे बीड येथील जेष्ठ पत्रकार आसुन या अभ्यागत मंडळात सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या एकाही पदाधिकाऱ्यास प्राधान्य दिल्या गेलेले नाही. खासदार असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे बजरंग बप्पा सोनवणे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली खरी मात्र विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्याची निवड होणे तर कोसो दूरच असल्याने एकूणच निवड झालेल्या या अभ्यागत मंडळा विषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट काँग्रेस व शिवसेना यांच्यासह सामान्य नागरिकातही सर्वत्र नाराजीचा उमटताना दिसून येत आहे.