
*_स्विकृत नगरसेवकपदी लोकविकास महाआघाडीचे राजकिशोर मोदी व बबनराव लोमटे_*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई नगरपरिषदेमध्ये लोकविकास महाआघाडीच्या तिकिटावर व राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक २० नगरसेवक निवडून आले. या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून अंबाजोगाई नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दिनेश मोतीलाल भराडीया यांची तर स्विकृत नगरसेवक म्हणून राजकिशोर मोदी व बबनराव लोमटे बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडींमुळे लोकविकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवक यांच्यावर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकविकास महाआघाडीचे गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक महेश बालासाहेब लोमटे, नगरसेवक मालू भगवान जोगदंड आणि नगरसेवक आकाश जिवनराव कराड यांच्यासह जाऊन गुरूवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी नगरसेवक दिनेश भराडीया यांनी लोकविकास महाआघाडीच्या वतीने उपनगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्याकडे दाखल केला होता. त्यानंतर नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवड करण्यासंदर्भात ठराव घेऊन ते मंजूर करण्यात आले. यावेळी लोकविकास महाआघाडीचे संख्याबळ पहाता उपनगराध्यक्षपदासाठी अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज न आल्याने दिनेश मोतीलाल भराडीया यांची अंबाजोगाई नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असल्याचे यावेळी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्याकडून जाहीर करण्यात आले. यावेळी लोकविकास महाआघाडीचे प्रमुख नगरसेवक राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.विष्णुपंत सोळंके, डॉ.नरेंद्र काळे, विशाल जाजू, गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक बबनराव लोमटे, ज्येष्ठ नगरसेवक हाजी इस्माईल हिरू गवळी, महेश बाळासाहेब कदम, महेश बालासाहेब लोमटे, ऍड.विकास रामकृष्ण काकडे, मालू भगवान जोगदंड, आकाश जिवनराव कराड, राजपाल संभाजी जावळे, नजीर उमरदराजखान पठाण, सौ.जयश्रीताई पृथ्वीराज साठे, सौ.दिपाताई बबन ऊर्फ दाजीसाहेब लोमटे, शेख शमीम शेख रहीम, बशीरा शफीक सय्यद, नाजनीन बेगम अकबरखाँ पठाण, शेख शिरीन अशफाक, सौ.श्रुतीताई अमोलराव लोमटे, सौ.संगिताताई दाजीसाहेब लोमटे, सौ.रेखाताई विलास जाधव, सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे हे लोकविकास महाआघाडीचे सर्व २० नगरसेवक आणि संकेत भैय्या मोदी, खालेदभाई चाऊस, रिपाइं नेते महेंद्र निकाळजे, भिमशक्तीचे भिमराव सरवदे, मनसे नेते सुनील जगताप, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, युवा आंदोलनचे अशोक पालके, बेटी बचावचे धीमंत राष्ट्रपाल, राष्ट्रवादीचे कल्याण भिसे, अमित जाजू, शेख मुख्तार, सय्यद रशीदभाई, अमोल लोमटे, भिमसेन लोमटे, अकबरभाई पठाण, सचिन जाधव, ऍड.अनिल लोमटे, जफरभाई शेख, रौफभाई बिल्डर, जावेद गवळी, विशाल पोटभरे हे उपस्थित होते. यावेळी नगरसेवक राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, ऍड.विष्णुपंत सोळंके, विशाल जाजू, गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक बबनराव लोमटे, दिलीपराव काळे व सर्व नगरसेवकांनी नुतन उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, व आगामी काळात अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी लोकविकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांकडून निवडीचे स्वागत करून फटाके फोडून, पेढे वाटून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
*सर्वांना सोबत घेऊन अंबाजोगाईचा विकास :*
लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित सर्व २० नगरसेवकांनी एकत्रित येत सर्वानुमते नगरपरिषदेत महाआघाडीचा अधिकृत गट स्थापन केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना लेखी पत्र देण्यात आले असून गट स्थापन करण्याबाबत व गटनेता निवडीचा ठराव व त्याबद्दलचे इतिवृत्त यापूर्वीच सादर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच लोक विकास महाआघाडीच्या गटनेतेपदी सय्यद ताहेरभाई यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडपत्राच्या अनुषंगाने गट स्थापन करून गटनेता निवड केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम व संबंधित नियमानुसार या गटाची अधिकृत नोंद घेण्यात यावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी दिनेश मोतीलाल भराडीया, स्विकृत नगरसेवकपदी माझी व आमचे सहकारी बबनराव लोमटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास हा आपला नेहमीचा मानक असून यासाठी पुढील जबाबदाऱ्या देताना सामाजिक अभिसरण व ज्येष्ठ व नव्या प्रतिनिधींची सांगड घालण्याचा आमचा विधायक प्रयत्न राहणार आहे. याच अभिसरण व समीकरणात माझे सहकारी दिनेश भराडीया यांची नगरपरिषद उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली
