अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शेपवाडी येथे छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला असा सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, २२३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १ मार्च २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शेपवाडी येथील रविकिरण ज्योतीबा शेप (वय २८) यांच्या घरी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मा. पोलीस निरीक्षक अंबाजोगाई यांच्या आदेशाने पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात आरोपीच्या ताब्यातून ‘विमल’ पानमसाला व त्याचे तंबाखू पाऊच तसेच ‘डारेक्टर’ पानमसाला व तंबाखू पाऊच असा एकूण अंदाजे ५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. नवनित काँवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, तसेच श्री ऋषीकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक शिंदे व कर्मचारी तेजेश वाहुळे, अमोल गायकवाड, सुशांत गायकवाड, भागवत नागरगोजे, युवराज राठोड यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
