लोकविकास महाआघाडीची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनातून मागणी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदारसंघातील बूथस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदार मॅपिंग (वोटर मॅपिंग) कामासाठी १० दिवसांची वाढीव कार्यमुक्ती (रिलिव्हींग) द्यावी अशी मागणी सोमवारी लोकविकास महाआघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
या संदर्भात आमच्या प्रतिनिधी बोलताना लोकविकास महाआघाडीचे नेते राजकिशोर (पापा) मोदी यांनी सांगितले की, लोकविकास महाआघाडीच्या वतीने सोमवार, दिनांक २३ मार्च रोजी जिल्हाधिकारी, बीड यांना अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केज विधानसभा मतदारसंघांतर्गत सध्या मतदार यादी अद्ययावत करणे आणि मतदार मॅपिंगचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू आहे. या कामासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची ‘बूथ स्तरीय अधिकारी’ (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामाचे स्वरूप हे व्यापक असून, भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक अडचणींमुळे तसेच या संदर्भात आम्हाला पुढील मुद्दे आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत जसे की, १) बीएलओंना ११ ते २० तारखे पर्यंत कार्यमुक्ती देण्यात आली होती. याकाळात अंबाजोगाई तालुक्यात फक्त ५८.१९ टक्के एवढेच मॅपिंगचे कार्य पूर्ण झाले आहे. अजूनही ४१.८१ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले नाही., २) १० दिवसांच्या कार्यमुक्ती काळात काही शिक्षक बीएलओंना १० वी बोर्डचे सुपरविजन आल्याने त्यांना नियोजित मॅपिंगचे कार्य करता आलेले नाही., ३) १० दिवसांच्या कार्यमुक्ती मध्ये दोन दिवस गुढी पाडवा आणि रविवारची सुट्टी असल्याने बीएलओंना केवळ ८ दिवस कामाचे मिळाले आहेत., ४) यादरम्यान मुस्लिम समाजातील मतदारांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने आणि ते उपासनेत असल्याने बीएलओ मॅपिंग कमी झाली आहे., ५) मॅपिंग संदर्भात सामान्य मतदारांमध्ये योग्य प्रमाणात जनजागृती झाली नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. २००५ च्या याद्या देखील सामान्य मतदारांसाठी अद्याप ही सहज उपलब्ध झालेल्या नाहीत. आणि ६) बहुतांश बीएलओ हे त्या बूथच्या बाहेरील रहिवासी असल्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहचणे कठीण झाले होते. त्यामुळे विशेषतः अंबाजोगाई शहरात मॅपिंगची टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे दिलेल्या विहित वेळेत हे काम पूर्ण करण्यास अनेक अडचणी येत आहेत. करिता मतदारांची अचूक नोंदणी आणि मॅपिंगचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळेची आवश्यकता आहे. त्यानुसार, अधिकृत कर्तव्यावर राहून हे राष्ट्रीय काम विनाव्यत्यय पूर्ण करता यावे, यासाठी ‘बूथ स्तरीय अधिकारी’ (बीएलओ) यांना त्यांच्या मूळ विभागातून (उदा. शिक्षण/महसूल इत्यादी विविध शासकीय कार्यालये) आणखी १० दिवसांची वाढीव कार्यमुक्ती (रिलिव्हींग) मिळावी, याबाबत आपल्या स्तरावर आपण मा.निवडणूक निर्णय अधिकारी, केज विधानसभा मतदारसंघ, केज यांना आदेशीत करावे, तसेच सदर कामाचे गांभीर्य लक्षात घेता आपण संबंधित विभागांना तसे आदेश निर्गमित करावेत अशी विनंती आमच्या सर्व सहकार्यांनी निवेदनाद्वारे केले आहे

असे निवेदक राजकिशोर मोदी (नेते – लोक विकास महाआघाडी.) यांनी सांगितले आहे. सदरील निवेदनावर पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा, मतदार संघ.), सय्यद ताहेरभाई (गटनेता – लोक विकास महाआघाडी, नगरपरिषद, अंबाजोगाई.), हाजी इस्माईल गवळी (ज्येष्ठ नगरसेवक), सुनिल जगताप (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), महेंद्र निकाळजे (रिपाइं आठवले गट), भिमराव सरवदे (बीड जिल्हा कार्याध्यक्ष, भिमशक्ती), राजेश वाहुळे (मराठवाडा युवा अध्यक्ष, लोकजनशक्ती पार्टी-रामविलास), अशोक पालके (संस्थापक अध्यक्ष, युवा आंदोलन), नगरसेवक महेश कदम, ऍड.विकास काकडे, मालू जोगदंड, आकाश कराड, राजपाल जावळे, नजीर उमरदराजखान पठाण, सौ.जयश्रीताई पृथ्वीराज साठे, बशीरा शफीक सय्यद, नाजनीन बेगम अकबरखाँ पठाण, सौ.श्रुतीताई अमोलराव लोमटे, सौ.संगिताताई दाजीसाहेब लोमटे, सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे यांच्या स्वाक्षर्या आहेत. तर निवेदन देताना अमोल लोमटे, दत्ता सरवदे, भिमसेन लोमटे, अकबर पठाण, रौफ बिल्डर, अशोक काळे, रफिक गवळी, नियामत भाई, विशाल पोटभरे, शाहेबाज मणियार, धीमंत राष्ट्रपाल, अनिस भाई, जीवन घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
