षडयंत्राच्या मास्टरमाइंडचा शोध घ्यावा- खडकत ग्रामस्थांची मागणी
आष्टी प्रतिनिधी :
आष्टी तालुक्यातील जामखेड ते माहिजळगाव या महामार्गावरील खडकत हे गाव असून या ठिकाणी पंचवीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौका मध्ये भगव्या ध्वजा शेजारी विनापरवाना लावण्यात आलेला नील ध्वज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नंतर देखील जयंती महोत्सव समितीने न उतरवल्यामुळे प्रशासनाने पोलीस संरक्षणात सदरील ध्वज उतरवल्याच्या रागातून दि.25 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वा.चे सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौक ते बस स्थानक परिसर आणि राज्य मार्गावरील दिसेल त्या प्रवासी आणि नागरिकांवर दगडफेक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता खडकत येथील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले गोवंश कत्तलखाने सध्या बंद असल्यामुळे त्यांनी या प्रकरणी नीलध्वजा चे निमित्ताने सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचे काम केले आहे असे बोलले जात असून या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी नेहमीप्रमाणे हिंदू समाजावर अन्याय न करता प्रत्यक्ष गुन्हेगार शोधावेत अशी मागणी खडकत ग्रामस्थांनी केली आहे.
आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक आणि उपविभागातील पोलीस यंत्रणा या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे सध्या सर्वत्र शांतता आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, मागील 20 ते 25 वर्षांपूर्वी खडकत येथील आष्टी कडे जाणाऱ्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करून त्या ठिकाणी भगवा ध्वज उभारण्यात आलेला आहे आता हा रस्ता रुंदीकरण करण्यात आल्या असला तरी चौकातील ओट्याचा आकार कमी करून त्या ठिकाणी भगवा ध्वज उभारण्यात आलेला आहे दरम्यान दि.13 एप्रिल रोजी मध्यरात्री वाळू उपसा करणाऱ्या हायवा द्वारे काही युवकांनी या भगव्या ध्वजा शेजारीच नील ध्वज बांधण्यात आलेला असल्याचे दि.14 एप्रिल रोजी सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने थोडीफार चर्चा झाली असता त्या ठिकाणी पोलीस प्रशासन हजर झाले त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या संमतीने जयंती समारोहा नंतर दि.20 एप्रिल नंतर हा नीलध्वज उतरवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते.
त्यानुसार दि. 22 एप्रिल रोजी विचारणा केली असता उडवा उडवीची आणि अरेरावीची उत्तरे मिळाली अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे खडकत नागरिकांमध्ये असंतोष पसरला परंतु पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांची बैठक होऊन प्रकरण मिटवण्यात आले आणि नीलध्वज उतरवण्याचा निर्णय झाला पण अंमलात आला नाही पण अखेर तहसीलदार आष्टी यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस संरक्षणामध्ये दि.24 एप्रिल 2025 रोजी सदरील नील ध्वज उतरवण्यात आला त्यानंतर दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वा.चे सुमारास खडकत येथील बस स्थानक परिसर, छत्रपती संभाजी चौका पासून सीना नदीवरील पुलापर्यंत पर्यंत जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासी नागरिकांवर दगडफेक करण्यात आली
त्यामध्ये खडकत येथील युवक जखमी झाले आहेत
वास्तविक पाहता गेली वर्षानुवर्षे खडकत येथे हिंदू आणि मुस्लिम एकत्रितपणे राहत असताना कधीही यापूर्वी असा प्रकार घडला नाही असे जुने जाणकार सांगतात हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून या घटनेमागचा पडद्याआडचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे
गोवंश हत्या बंदीमुळे हे षडयंत्र रचले असावे ?
छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये नीलध्वज लावला आहे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती होईपर्यंत राहू द्यावा अशी समंजस भूमिका खडकत ग्रामस्थांनी घेतली होती मात्र जयंती महोत्सव दि.20 एप्रिल रोजी सुरू असताना जयंती मिरवणुकीचा पारंपारिक मार्ग बदलून जयंती मिरवणूक ही हेतू पुरस्सर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आणण्यात आली आणि त्या ठिकाणी थांबवण्यात आली यावेळी प्रथमच या जयंती मिरवणुकीमध्ये नीलध्वजा बरोबरीने हिरवे ध्वज देखील फडकवण्यात आले हा प्रकार खडकत गावात गोवंश हत्या बंदी झाली असल्याने तसेच खडकत येथील काही गोरक्षक हे पोलिसांना त्याची माहिती देतात त्यामुळे ग्रामस्थांच्या विरुद्ध या गोहत्या करणाऱ्यांनी काही जणांना भडकावले असल्याची चर्चा आहे ? तीच पार्श्वभूमी या घटनेमागे असावी ? असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. मिरवणुकीचा मार्ग बदलला तरी त्याला या ग्रामस्थांनी आक्षेप घेतला नाही. सर्व ग्रामस्थांनी हिंदू संघटनांनी अत्यंत समंजस्याने भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य केलेले आहे.
पोलिसांनी मात्र प्रत्यक्ष दगडफेक करणारे, प्रशासनासमोर शिवीगाळ करणारे, यांना अटक केली नसून घटनेनंतर दुपारी 1.00 वाजता खडकत येथे पुण्याहून पोहोचलेल्या सचिन बुवा साहेब पवार युवकाला पोलिसांनी पकडून नेले आहे
त्यामुळे पोलिसांनी शांत आणि संयमी असलेल्या हिंदू समाजावर आणि युवकांवर करू नये असे बोलले जात आहे.