आष्टी

आष्टीत दिवसाढवळ्या घरात घुसून घातक शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी..

२ लाख रु.चे सोन्याचे दागिने, ६० हजार रोख रक्कम चोरीला एक आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात तर दोन आरोपी फरार

आष्टी प्रतिनिधी :

 आष्टी शहरातील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत ढेरे यांच्या घरी भर दुपारी ४.३५ वा. चे सुमारास घरात घुसून घरातील एकट्या असलेल्या पत्नीला गावठी पिस्तूल सारखे घातक शस्त्र आणि चाकूचा धाक दाखवून साडीने तोंड, हात, पाय, बांधून गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण, तीन ग्रॅम कानातील रिंग आणि ६० हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये घरगडी सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. एक आरोपी अटक असून त्याचे दोन साथी दार अद्याप फरार आहेत. भर दिवसा झालेल्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,

 रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी डॉ.चंद्रकांत ढेरे हे दवाखान्यात असताना दुपारी ४.३० वा.चे सुमारास घरी त्यांच्या पत्नी शिक्षिका श्रीमती विद्या ढेरे पाटील या एकट्या असताना त्यांच्याच दवाखान्यामध्ये आणि घरामध्ये घरगडी म्हणून काम करणारा शिवा बावरे हा भाजीपाला बाजाराची पिशवी घेऊन आला, टरबूज मिळाले नाहीत बाकी सर्व भाजीपाला आणला आहे असे म्हणून बाहेर गेला आणि पाच मिनिटांनी दोन टरबूज घेऊन आला त्याचबरोबर त्याच्या मागून दोन अनोळखी इसम घरात आले त्यांनी दार आतून बंद केले चोरट्यांच्या हातात गावठी पिस्तुला सारखे शस्त्र आणि मोठ्या चाकूचा धाक दाखवून घरामध्ये काय काय ठेवलेले आहे ?

ते काढून दे असे म्हणून डॉक्टर पत्नीचे गळ्यातील मिनी गंठण आणि कानातले सोन्याचे सुई दोरा काढून घेतला डॉक्टरांच्या पॅन्टमधील ६० हजार रूपये काढून घेतले

घरांतील कपाटे उचकून काही मिळाले नाही परंतु त्यातील दोन साड्यांनी हात पाय तोंड घट्ट बांधून बेडरूम मध्ये उभे राहण्याची सांगितले सुमारे एक तासभर हे थरार नाट्य सुरू होते मात्र त्यानंतर हे दोन्ही चोरटे घराबाहेर गेले त्यांचे बरोबर घरगडी असलेला शिवा हा बाहेर गेला आणि परत आला आणि म्हणाला मॅडम आता चोर गेले आहेत असे म्हणून त्यांचे बांधलेले हात पाय सोडले या सर्व प्रकाराने डॉक्टर पत्नी या भयभीत झालेल्या दिसून आल्या चोरांना काहीही प्रतिकार न करता शांतपणे बसून राहिलेला घरगडी या घटनेत सामील झाल्याचे दिसून आल्यामुळे यापुढे विश्वास कोणावर ठेवायचा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे रात्री उशिरा या घटने ची फिर्याद घेण्यात आली आणि घरगडी शिवा याला अटक करण्यात आली असून दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत रविवार असलेल्या बाजाराच्या दिवशी भर दुपारी घडलेल्या या घटने मुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून एकट्या दुखट्या निवासस्थानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893908
error: Content is protected !!