शिक्षक निवड चाचणी परीक्षेसाठी बीड,अहिल्यानगर परीक्षा केंद्र पुर्ववत ठेवावेत माजी आ.धोंडे यांची शिक्षणमंत्र्याकडे मागणी…
आष्टी प्रतिनिधी:
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बीड व अहिल्यानगर हे परिक्षा केंद्र पुर्ववत ठेवावेत अशी मागणी माजी आ. भीमराव धोंडे यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
ना.दादासाहेब भूसे यांना पाठवलेल्या निवेदनात माजी आ. भीमराव धोंडे यांनी म्हटले आहे की, शिक्षक अभियोग्यता आणि बुध्दीमत्ता चाचणी २०२५ आयबीपीएस कंपनी मार्फत महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद
यांच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत घेण्यात येणाऱ्या टेट (TAIT) परिक्षेसाठी बीड व अहिल्यानगर येथील केंद्र समाविष्ट करुन प्रत्यक्षात बीड व अहिल्यानगर या केंद्रावर परिक्षा घ्याव्यात. राज्यात
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद अंतर्गत डी.एड.व बी.एड.उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुध्दीमत्ता चाचणी टेट परिक्षा देवून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी ही चाचणी उमेदवारांच्या अध्यापन क्षमता आणि सज्ञानात्मक मुल्यांकनासाठी
घेतली जाते. यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि.२६ एप्रिल ते दि.१० मे २०२५ पर्यंत सुरु आहे.परंतु आपल्या निरिक्षणाखाली आयबीपीएस कंपनीच्या साईटवर फॉर्म भरताना बीड व अहिल्यानगर या ठिकाणच्या
परिक्षा केंद्र उपलब्ध नसल्याने बीड व
अहिल्यानगर जिल्हयातील डी.एड., बी.एड.व टी.ई.टी.पात्र उमेदवारांची
परिक्षेसाठी प्रचंड गैरसोय होत आहे.
वास्तविक या जिल्ह्यात पात्र उमेदवारांची संख्या अधिक आहे.या परिक्षेसाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक इत्यादी ठिकाणी परिक्षेसाठी जाणे गैरसोयीचे
आहे व सद्यस्थितीत कडक उन्हाळा असल्याने अनेक उमेदवार चाचणी परिक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता
आहे. वास्तविक आयबीपीएस मार्फत बीड व अहिल्यानगर येथून सध्या इतर परिक्षा घेतल्या जात आहेत परंतु उमेदवारांना त्रास होईल यासाठी जाणीवपुर्वक बीड व अहिल्यानगर येथील परिक्षा केंद्राचे ठिकाण ऑनलाईन अर्ज
प्रक्रियेतून वगळण्यात आलेले आहे.बीड व अहिल्यानगर हे ठिकाण समाविष्ट करुन ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत शिक्षक अभियोग्यता आणि बुध्दीमत्ता चाचणी २०२५ ही परिक्षा घेण्यात यावी व उमेदवारावर होणारा अन्याय टाळावा असेही माजी आ.भीमराव धोंडे यांनी म्हटले आहे.