बीड

दहा महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांचे वेतन थकले.

बीड प्रतिनिधी : 

महाराष्ट्र राज्य १०२ रुग्णवाहिका चालक कर्मचारी यांचे ऑगस्ट २०२४ पासून ते आजपर्यंत जवळपास साडेनऊ ते दहा महिन्यांचे वेतन थकले. यामुळे ते वेतन मिळवण्यासाठी आज १०२ रुग्णवाहिका चालक कर्मचारी संघटना यांनी काम बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला.

              बीड जिल्ह्यातील  १०२ आपत्कालीन रुग्णवाहक सेवा चालकांना मागील १० महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अनेक चालक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या आर्थिक संकटाला कंटाळून ३० जून २०२५ पासून बीड जिल्ह्यात व तालुक्यात काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पण आषाढी एकादशीनिमित्त रुग्णांची हेळसांड होऊ नये. म्हणून या संघटनेने त्याच दिवशी हा संप मागे घेतला होता.रविवार (दि.६) जुलै पर्यंत वेतन अदा करण्याची मागणी करून सुद्धा आजपर्यंत या कर्मचार्‍यांचे वेतन मिळालेले नाही. यासंबंधी शासनाने विचार करून संबंधित कंत्राटदारास व चालकांचे थकीत मासिक पगार देण्यास हे मानधन निविदेप्रमाणे प्रति वाहन चालकास दरमहा २५ हजार १५९ रुपये एवढे देण्यात यावे. यासाठी आज सोमवार (दि.७)रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी उपोषण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893870
error: Content is protected !!