
बीड प्रतिनिधी :
शहरातील खासबाग परिसरातील बिंदुसरा नदीपात्रात दोन महिन्याच्या नवजात मुलीचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आला आहे. या घटनेमुळे बीड शहरात खळबळ उडाली असून मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवार (दि.२५) रोजी सकाळी शहरातील बिंदुसरा नदीपात्रात काही नागरिकांना एका नवजात मुलीचा मृतदेह दिसला होता. यावेळी याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून,शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले आहे.नवजात मुलीचे वय अंदाजे दोन महिने असून, ती कोणाची आहे आणि मृतदेह नदीपात्रात कसा आला याबाबत माहिती समोर आलेली नाही. घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करणार आहेत
